भटक्या कुत्र्यांसाठी मुंबईत निवारा केंद्र..... विधानसभेत मंत्री उदय सामंत यांची माहिती
मुंबई / रमेश औताडे
राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध स्तरांवर व्यापक उपाययोजना सुरू असून
मुंबईतील भटक्या कुत्र्यांसाठी येत्या सहा महिन्यात निवारा केंद्र सुरू करण्यात येईल. अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
राज्यात एकूण १४ लाख ८० हजार भटकी कुत्री असून त्यापैकी ९४ हजार कुत्री मुंबईमध्ये आहेत. यावर्षी ६५ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून ९७ हजार ९६० कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
मुलुंड आणि मालाड येथे तीन हजार स्वे.फूट तर नाहुर येथे आठ हजार ४११ स्वे.फूट जागेची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सूचित केल्यानुसार पुणे, मुंबई, कल्याण डोंबिवली, पिंपरी चिंचवड आणि नाशिक महानगर पालिकांनी प्राणी जन्म नियंत्रण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
Comments
Post a Comment