सकल मांग गारुडी समाजाच्या लढ्याला मोठे यश

मुंबई / रमेश औताडे 

सकल मांग गारुडी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विधान भवन, मुंबई येथे आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची गंभीर दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.

समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत मंत्री महोदयांनी येत्या १५ दिवसांच्या आत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे प्रस्तावित आत्मदहन आंदोलनास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे. 

यावेळी राष्ट्रीय नेते अमर कसबे, मुरलीधर गायकवाड, हरीश सकट, सचिन लोंढे, सुखदेव राखपसरे, अमोल राखपसरे, दिगंबर नाडे, राम सकट, पुंडलिक राखपसरे, भरत राखपसरे, भगवान ढालवाले, दादा ढाले, अनिल हातागळे, रमेश सकट, प्रकाश राक्षे, राहुल खडसे, नवनाथ राखपसरे, मधुकर सकट, राजेश सकट, उमेश कसबे, विजय कसबे, बाळू लोंढे, कुंदन सकट, भगवान लोंढे, नानू अहिर, प्रफुल सोलंकी, सुनील हातागळे तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला, युवक, पदाधिकारी व शेकडो समाजबांधव उपस्थित होते.

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
रमेश औताडे 7021777291
बातम्या साठी संपर्क करा

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश