नाल्यात उतरून मनसेचा निषेध
नवी मुंबई / रमेश औताडे
नवी मुंबई घणसोली विभागातील नोसिल नाका ते रिद्धी सिद्धी सोसायटी ब्रिज पर्यंत नाले साफसफाईच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत घणसोली मनसेचे विभाग अध्यक्ष नितीन नाईक, रोहन पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाल्यात उतरून निषेध व्यक्त केला.
घणसोली विभाग सचिव संजय कोळी म्हणाले, नाल्यातील गाळ न काढल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मनसेचे उपविभाग अध्यक्ष योगेश गायकर, शाखाध्यक्ष भरत लोंढे, दीपक साबले,केतन कोळी, संदीप डाकवे, महाराष्ट्र सैनिक भानुदास पाटील यांनी निषेध नोंदवला
Comments
Post a Comment