तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची गरज पडणार नाही

मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 

आपला देश हा अफगाणिस्तान, इराण, इराक या देशातून औषधीकरिता कोट्यावधी रुपयाची अफू आयात करतो. अशी आयात बंद करा व आपल्या देशातील शेतकऱ्याला शेतीच्या दहा टक्के भागावर अफू लागवड करण्याची परवानगी द्या व आपणच जगाला अफू निर्यात करूया. असे केले तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची सुद्धा गरज पडणार नाही. अशी मागणी  महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी  मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी, पीक विमा, सिंचन प्रकल्प आणि कृषी पायाभूत सुविधांद्वारे बळीराजाला सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत तरीसुद्धा शेतकरी  आत्महत्या करीत आहेत. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित भागात शेतकरी हा चिंतेच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे.

खासगी कंपन्यांना अपू उत्पादन करण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. त्यांना परवानगी दिली तर बजान हेल्थकेअर ही कंपनी परवानगी मिळणारी पहिली कंपनी ठरेल. सरकारने ज्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करीत आहे त्या जिल्ह्यात अपू लागवडी चे परवाने द्यावेत असे सेंगर यांनी सांगितले.



Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश