दलित पॅंथरच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
दलित पॅंथरच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई / रमेश औताडे
दलित पॅंथर या संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन कामोठे, नवी मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी भूषवले, तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. घनश्याम भोसले होते. आरपीआय कामोठे शहराध्यक्ष ॲड. मंगेश धीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
समाजावरचा अन्याय थांबत नाही, त्यामुळे सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन दलित पॅंथरमध्ये सहभागी होण्याची गरज आहे.असे असे मुंबई अध्यक्ष प्रमोद निकम यांनी सांगितले. नगरसेवक हॅप्पी सिंग, उद्योजक दयानंद , प्रमोद लोखंडे, सुप्रिया बनसोडे, अरविंद मोरे, मुजीबभाई शेख, रमेश गवारी, सखाराम पाटील, अंकुश आवडे, आकाश बोंडे, तसेच मनोज गायकवाड (कोकण प्रांत अध्यक्ष) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई अध्यक्षपदी प्रमोद निकम तर रायगड जिल्हाध्यक्षपदी सुदर्शन साबळे यांची नियुक्ती केली.
१९७२ साली पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांनी स्थापन केलेल्या या संघटनेने सामाजिक न्याय, समानता आणि स्वाभिमानासाठी मोठे योगदान दिले आहे. त्या परंपरेला पुढे नेत या नव्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली असे मुंबई अध्यक्ष प्रमोद निकम यांनी सांगितले.
Comments
Post a Comment