*मुंबई उच्च न्यायालयातील उदयोन्मुख वकील मितांशु स्नेहा राजेश पुरंदरे यांचे त्यांच्या फोर्ट येथील कार्यालयात जाऊन अभीष्टचिंतन करतांना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, सोबत ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे.*
मुंबई / रमेश औताडे बेस्ट प्रवासी आणि कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत, अशा धोरणांना पाठिंबा देणाऱ्या सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात सर्व कामगार संघटना एकत्रितपणे १८ जून पासून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. ऍड.उदयकुमार अनंत आंबोणकर, पवन गायकवाड, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. बशीर अहमद, कॉ. हरीश गायकवाड, गजानन नागे, नितीन पाटील, गौरीशंकर खोत, विलास पवार व इतर संघटनांचे नेते यावेळी समितीच्या झेंड्याखाली राजकारण सोडून कामगारांच्या व प्रवाशांच्या हितासाठी एकत्र आले आहेत. बेस्टचा क अर्थसंकल्प महापालिकेच्या अ अर्थसंकल्पात विलीन करा, निवृत्त कामगारांची कायदेशीर देणी एकरकमी द्या, २०१६ ते २०२६ चा वेतन करार ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकीसह द्या, बेस्टचे परिवहन व विज विभागाचे कंत्राटीकरण रद्द करून वेटलिज कामगारांना बस सह बेस्ट मध्ये सामावून घ्या, बेस्टच्या स्वः मालकीच्या ५००० बस आणा, आवश्यक कामगार भरत...
वीज (दुरुस्ती) मसुद्या वर देशभरातील संघटनांचा तीव्र आक्षेप कॉम्रेड कृष्णा भोयर (मुंबई) विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा! मुंबई / मंत्रालय प्रतिनिधी... रमेश औताडे केंद्र सरकारने आणलेल्या 'वीज (दुरुस्ती) मसुदा विधेयक २०२५' च्या माध्यमातून वीज वितरण क्षेत्राचे खासगीकरण राज्य सरकारांवर लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ एम्प्लॉईज अँड इंजिनियर्स (NCCOEEE) या देशातील २७ लाख वीज कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. हे विधेयक ग्राहक, शेतकरी आणि वीज कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधी असून, केंद्र सरकारने हा मसुदा तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसे न झाल्यास देशव्यापी संप पुकारण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. ४ नोव्हेंबर २०२५: पनवेल येथे झालेल्या राष्ट्रीय बैठकीनंतर NCCOEEE ने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन आपली ...
राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई / रमेश औताडे राज्यातील कामगार विभागांतर्गत येणारी सर्व सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम आणि कार्यक्षम होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कामगार विभागाने तत्काळ राबवाव्यात, असे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी दिले. राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा सविस्तर आढावा कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात घेण्यात आला. या बैठकीस कामगार आयुक्त एच.पी.तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, अवर सचिव दिलीप वनिरे तसेच कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील एकूण १६ सुरक्षा रक्षक मंडळांचा सर्वसाधारण आढावा घेण्यात आला. यावेळी प्रत्येक मंडळासमोरील अडचणी, त्यांच्या कार्यातील अडथळे तसेच त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कामगार मंत्री ॲड .फुंडकर यांनी या मंडळांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी, विविध आस्थापना आणि जिल्ह्यांतील आरोग्य विभाग तसेच रुग्णालयांमध्ये सुरक्षा रक्षकांची आवश्यकता तपासून त्यानु...
Comments
Post a Comment