जेफ्री एपस्टीन अहवालाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन


मुंबई / रमेश औताडे 

आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरणासंदर्भात अलीकडे समोर आलेल्या अहवालांमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून या प्रकरणातील सत्य बाहेर यावे, पारदर्शकता राखली जावी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे, या मागणीसाठी मुंबई प्रदेश युवक काँग्रेस युवक अध्यक्ष झीनत शब्रीन यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान जवळ मुंबई प्रेस क्लब समोर निषेध आंदोलन करण्यात आले.

जेफ्री एपस्टीन प्रकरणात मानवी हक्क, सत्तेचा गैरवापर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये सत्य दडपले जाऊ नये, जनतेसमोर सर्व बाबी स्पष्ट व्हाव्यात, यासाठी युवक काँग्रेसने आपली भूमिका मांडली.

यावेळी पंकज चौधरी,हुसेन शेख, अमनदीप सैनी, आणि तेजस चांदुरकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन पूर्णतः अहिंसक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. आंदोलनासाठी मुंबई पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती. सार्वजनिक सुव्यवस्था, वाहतूक किंवा कायदा-सुव्यवस्थेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेतली होती. या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा