Motorola Signature भारतात लाँच;
DXOMARK गोल्ड कॅमेरा, प्रीमियम डिझाइन आणि 24x7 Signature Club सेवा
मुंबई, 23 जानेवारी 2026:
मोटोरोला यांनी भारतात आपला अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन Motorola Signature लाँच केला आहे. या फोनमध्ये DXOMARK गोल्ड लेबल मान्यतेसह जगातील सर्वोत्तम कॅमेरापैकी एक देण्यात आला असून, भारतातील पहिली 24x7 Signature Club प्रीव्हिलेज सेवा उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये 50MP ट्रिपल Sony LYTIA प्रो-ग्रेड कॅमेरा सिस्टम, 8K Dolby Vision व्हिडिओ, Snapdragon® 8 Gen 5 प्रोसेसर, 6.8-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले आणि Moto AI 2.0 देण्यात आले आहे. एअरक्राफ्ट-ग्रेड अॅल्युमिनियम फ्रेम आणि फॅब्रिक-प्रेरित प्रीमियम फिनिशसह हा फोन लक्झरी डिझाइनमध्ये येतो.
Motorola Signature 12GB+256GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB या व्हेरिएंटमध्ये Pantone Martini Olive व Pantone Carbon रंगांत उपलब्ध होईल. प्रभावी लाँच किंमत Rs. 54,999 पासून असून विक्री 30 जानेवारी 2026 पासून Flipkart, Motorola.in आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होणार आहे.
यासोबतच मोटोरोला यांनी Polar-सपोर्टेड Moto Watch देखील सादर केला असून, प्रगत वेलनेस ट्रॅकिंगसह हा स्मार्टवॉच Rs. 5,999 पासून उपलब्ध होणार आहे.
Motorola Signature लाँचवेळी (डावीकडून उजवीकडे): रुबेन कॅस्तानो, व्हाइस प्रेसिडेंट – डिझाइन, ब्रँड अँड CX, मोटोरोला; अमर बाबू, प्रेसिडेंट – लेनोवो, आशिया पॅसिफिक; कृती सॅनॉन, मोटोरोला इंडियाची ब्रँड अॅम्बेसेडर; प्रशांत मणी, व्हाइस प्रेसिडेंट – मोटोरोला आशिया पॅसिफिक आणि राजीव मखनी.
Comments
Post a Comment