आरोपीच्या अटकेसाठी सामाजिक संघटना एकवटल्या

        आरोपीच्या अटकेसाठी सामाजिक संघटना एकवटल्या
मुंबई / रमेश औताडे 

समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांची बदनामी करणे व यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीला ताबडतोब अटक करावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी उपजिल्हाधिकारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या सचिव आशा पठाण यांना निवेदन देऊन गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, डॉ आंबेडकर लॉयर असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सुरेश घाटे, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रमेश दुपारी,  अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक महासंघाचे अध्यक्ष धर्मा बागडे हे पदाधिकारी निवेदन देताना शिष्टमंडकार होते.

निवेदनात आरोपी रविंद कोटंबकर यांच्या नावाचा उल्लेख केला असून, त्यांचे सोबती निलंबित लिपिक सुशील शिंदे, बडतर्फ अधिकारी बाबासाहेब देशमुख यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. रविंद कोटंबकर यांच्या नावावर सात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या आरोपींवर मोक्का अंतर्गत अटक करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा