जगाने कितीही प्रगती केली तरी योगाला पर्याय नाही --- डॉ. आर. गोविंद रेड्डी यांचे मत

         जगाने कितीही प्रगती केली तरी योगाला पर्याय नाही --
                        डॉ. आर. गोविंद रेड्डी यांचे मत

मुंबई / रमेश औताडे 

योगाचे महत्व ऋषी मुनींनी सांगितले आहे. आज जग कितीही प्रगती करत असेल. मात्र योगाला पर्याय नाही. असे मत सीएआरआय मुंबईचे सहाय्यक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी व्यक्त केले. योगाच्या आधारे आरोग्य सुधारण्यासाठी गुरुवारी १९ जून २०१५ रोजी नवी मुंबईतील जेएनपीए कॅम्पसमध्ये जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि आरआरएपी-केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, वरळी, मुंबई, सीसीआरएएस, आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने योगा पार्कचे उद्घाटन करण्यात आले. या योग पार्कचे उद्घाटन नवी मुंबईतील जेएनपीएच्या अध्यक्ष श्री. उन्मेष वाघ (आयआरएस) यांच्या हस्ते झाले. या वेळी जेएनपीएच्या सचिव आणि प्रशासन प्रमुख श्रीमती मनीषा जाधव आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसह सीएआरआय मुंबईचे सहाय्यक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री