कचरा वेचक महिलांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

   कचरा वेचक महिलांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

मुंबई / रमेश औताडे

घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात कार्यरत असलेल्या कचरा वेचक महिलांना अद्याप कोणतेही नियमित वेतन, विमा सुरक्षा व शासकीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या श्रमाचे शोषण सातत्याने सुरू असून, मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर, ठाणे महानगरपालिकेने १५० कचरा वेचक महिला कामगारांचा रोजगार काढून घेतल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या अन्यायकारक परिस्थिती विरोधात राष्ट्रीय मातंग स्वाभिमानी संघटनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला असता शिंदे यांनी घेतली दखल घेत निर्देश दिले.

संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीपभाऊ यादव व मातंग समाजाचे युवा नेते राजीव मानकर यांनी वागळे इस्टेट येथील या महिलांचे दुःख व त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपमुख्यमंत्री यांना  सांगितल्यानंतर  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ ठाणे महानगरपालिका उपायुक्त मनीष जोशी  निर्देश दिले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. कचरा वेचक महिलांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कचरा वेचक महिलांनी आभार मानले आहेत.









Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा