अंकुशराव पाटील होनाळीकर यांच्याकडून परिवहन मंत्र्यांचे आभार
अंकुशराव पाटील होनाळीकर यांच्याकडून परिवहन मंत्र्यांचे आभार
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मंत्रालय मुंबई येथे राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी भेट घेऊन बटणपुर- देवणी - होनाळी -येनकी-उदगीर बस दुपारी चार वाजता चालु करण्यात यावी म्हणून निवेदन दिले.
परिवहन महामंडळ मुंबई सेंट्रल महाव्यवस्थापक वाहतूक यांनी विभागीय नियंत्रक लातुर यांना बस चालु करण्या बाबत सुचना केली.
बस चालु होवुन होनाळी गावात बस आल्यावर बसचे चालक व वाहक यांचे पुष्पहार घालून बालाजीराव बिरादार यांनी स्वागत केले.
विनोद मुळे,पिराजी कोळी,आत्माराम आलुरे, कामाजी बालुरे, विठ्ठल बेळकोणे,लक्ष्मण गिरी, दिपक आलुरे उपस्थित होते. बस चालु झाल्यामुळे होनाळी,भोपणी,माणकी,येनकी,जकनाळ,उदगीर या गावातील नागरीक प्रवाशी,विद्यार्थी, विदयार्थीनी ना शाळेतून येण्यासाठी सोय होणार आहे.
विभागीय नियंत्रक लातुर अश्विजराव जानराव, आगार प्रमुख उदगीर चिन्मय चिटणीस, वाहतुक निरीक्षक अशोकराव पवार, वाहतुक कंट्रोलर देवणी शिवाजीराव पाटील, भानुदास म्हेञे यांचे आभार राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशरावपाटील होनाळीकर यांनी मानले.
Comments
Post a Comment