सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेतचौकार, षटकारांची आतषबाजी

                 सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेत

                चौकार, षटकारांची आतषबाजी

               बालाजी क्लबची उपांत्यफेरीत धडक
मुंबई : प्रसाद रानडे

सांताक्रुझच्या एअर इंडियाच्या ग्राऊंडवर सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेत चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरु आहे. आसमंतात उकाडा असला तरी मैदानावर धावांचा पाऊस पडतोय. स्पर्धेच्या दुसऱ्यादिवशी मुंबईच्या बालाजी क्लबने इमरोज खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकात्याच्या एंजेल धमाकाचा ६ गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरीत धडक दिलीय.

एंजेल धमाकाने ८ षटकांत ८ विकेच्या मोबदल्यात ६७ धावा केल्या. सरोज प्रामाणिकने २ चौकर आणि २ षटकारांसह १५ चेंडूत २७ धावा केल्या. बालीजीतर्फे इमरोज खानने १७ धावात ४ बळी टिपले प्रत्युतरादाखल बालाजी क्लबने ६.२ षटकात ४ विकेटच्या मोदबदल्यात विजयी लक्ष पुर्ण केले. बालाजीच्या विजयात निर्णायक कामगिरी करणाऱ्या इमरोज खानला मॅन ऑफ द मॅच किताबाने गौरविण्यात आले.

त्यापुर्वी उपउपांत्यपुर्व फेरीत बालाजी क्लबने फर्दिन काझीच्य (२१ चेंडूत ३९ धावा आणि ५ चौकार) फटकेबाजीच्या जोरावर सिंधुदुर्गच्या दिपकदादा प्रितष्ठान ग्लोरियस मैत्री संघाचा १३ धावांनी पराभव केला. बालाजी क्लबने ८ षटकात ५ विकेटच्या मोबदल्यात ७२ धावा केल्या. प्रतिस्पर्धी ग्लोरियस मैत्रीसंघाला ८ षटकात ६ विकेटच्या मोबदल्यात अवघ्या ५९ धावा केल्या.

तर कोलकात्याच्या एंजेल धमाकाने उपउपांत्यपुर्व फेरीत मुंबईच्या विक्रोळीअन्स रोहीत इलेव्हनचा २९ धावांनी पराभव केला. एंजेल धमाकाने ८ षटकात ६ विकेटच्या मोबदल्यात ८६ धावा केल्या. एंजेलच्या संजू कनोजियाने ९ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासहीत २१ धावा केल्या. विक्रोळीयन्स रोहीत इलेव्हनला ८ षटकात ७ विकेटच्या मोबदल्यात ५७ धावा केल्या.

पुण्याच्या डिंगडॉग संघाने यापुर्वीच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेची फायनल १३ एप्रिलरोजी होणार आहे. विजेत्या संघाला १२ लाख रुपये आणि संघातील प्रत्येकाला बाईक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे यंदाचे ११ वे वर्ष आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा