पुण्याच्या डिंग डाँग संघाची सुप्रिमोच्या उपांत्यफेरीत धडक

      पुण्याच्या डिंग डाँग संघाची सुप्रिमोच्या उपांत्यफेरीत धडक
मुंबई / प्रसाद रानडे

टेनिस क्रिकेटचा वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यफेरीत पुण्याच्या डिंग डाँग उर्फ रेड डेव्हिल्स संघाने धडक दिली. त्यांनी पालघरच्या ताई पॅकर्सचा ८ गडी राखून पराभव केला.

सांताक्रुझ येथील एअर इंडियाच्या मैदानावर आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेचे यंदाचे हे ११ वे वर्ष आहे. देशातील सर्वाधिक रकमेची बक्षिस स्पर्धा अशी सुप्रिमो चषकाची ओळख आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला बाईक मिळणार असून संघाला १२ लाख रुपये मिळणार आहेत.

उपउपांत्य सामन्यात पालघऱच्या ताई पॅकर्सने ८ षटकात ८ बाद ५४ धावां केल्या. ताई पॅकर्सतर्फे करणने २३ चेंडूत ३१ धावा करीत एकाकी झुंज दिली. रेड डेव्हिल्स उर्फ डिंगडाँग संघातर्फे राजेश सोरटेने अचूक गोलंदाजी करीत ६ धावांत ३ बळी घेतले. डिंग डाँग संघाने ८ विकेट राखून ५.३ षटकातच ५५ धावा करीत ताई पॅकर्सचा पराभव केला आणि उपांत्यफेरीत धडक दिली. डिंग डाँग संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारा राजेश सोरटे मॅन ऑफ द मॅच ठरला.

या नॉक आऊट क्रिकेट स्पर्धेसाठी ७० हून अधिक संघांनी नोंदणी केली असून त्यामधून अंतिम १६ संघांची निवड स्पर्धेतील सहभागासाठी केली गेली आहे. कर्नाटक, कोलकाता, दिल्ली, गोवा, गुजरात,  मध्य प्रदेश, राजकोट, केरळसहीत देशातील अव्वल टेनिस क्रिकेटपटू तर या स्पर्धत सहभागी होणार आहेतच पण यंदा कर्नाटकच्या एफ.एम.हॉसपेट संघातून श्रीलंकेचे क्रिकेटरही आपल्या क्रिकेटचा जलवा दाखविणार आहेत.

दरम्यान ताई पॅकर्सने उपउपांत्यपूर्व फेरीत राजकोटच्या एल.के.स्टारचा २४ धावांनी पराभव केला. तर डिंग डाँगसंघाने मुंबईच्या यु.एस.इलेव्हनचा ६ विकेट राखून पराभव केला होता.

प्रसाद रानडे क्रिडा प्रतिनिधी पी आर न्यूज 
सुप्रीमो क्रिडा नगरी , सांताक्रुझ मुंबई

सुप्रिमो चषकाचे ११ सीजन खेळणारे ओमकार देसाई, क्रिष्णा सातपुते आणि प्रीतम परब या खेळाडूंचा आयोजकांकडून ट्रॉफी देऊन विशेष सत्कार करण्यात आला.


Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा