५६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महाराष्ट राज्य लॉटरीचा विशेषांक
५६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महाराष्ट राज्य लॉटरीचा विशेषांक
मुंबई / रमेश औताडे
" असेल हरी तर देईल खाटल्यावरी " अशी एक म्हण आहे. " नशिबात असेल तर श्रीमंती आपोआप येईल " या म्हणी प्रत्यक्षात पूर्ण करणारी महाराष्ट्र राज्य लॉटरी ५५ वर्ष पूर्ण करून ५६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. ५६ व्या वर्षांच्या उंबरठ्यावर आज महाराष्ट्र राज्य लॉटरी पोहोचली आहे. पारदर्शक, आदर्श लॉटरी म्हणून ५५ वर्षापासून ज्या लॉटरीकडे पाहिले जाते त्या लॉटरीचा ५६ वा वर्धापनदिन १२ एप्रिल रोजी २०२५ रोजी साजरा करत आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरी ची ५५ वर्षाची परंपरा असलेली माहिती असणारा परिपूर्ण असा लॉटरी विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे. लॉटरी ग्राहक, विक्रेते, वितरक, हितचिंतक, लेखक, छायाचित्रकार, व्यंगचित्रकार आणि अभ्यासकांना निमंत्रीत करण्यात आले आहे. अशी माहिती या विशेषांकाचे संपादक सुमित वि. सातार्डेकर यांनी दिली.
यावेळी सातार्डेकर म्हणाले, ग्राहकांना बक्षिसे, विक्रेत्यांना रोजगार, सरकारला विकास कामांसाठी महसूल उपलब्ध करण्यात महाराष्ट्र राज्य लॉटरीने गेली ५५ वर्षे महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लॉटरी भविष्य व त्यासाठी उपाययोजना याबाबत ऊहापोह करण्यात आला. या पार्श्वभुमीवर या लॉटरी विशेषांकात लॉटरी विषयक लेख, मुलाखती, अनुभव, इतिहास, व्यंगचित्रे, छायाचित्रे, काव्ये, भविष्यासाठी अपेक्षा या सर्वांचा समावेश करण्याचे योजले आहे.
५५ वर्षाची परंपरा असणारा लॉटरी चा इतिहास या लॉटरी विशेषांकात प्रकाशित होणार आहे. त्यामुळे ५ एप्रिल २०२५ पूर्वी आपण आपले साहित्य, फोटो, लेखासह पुढील पत्त्यावर पाठवावे. सुमित वि. सातार्डेकर, संपादक लॉटरी विशेषांक. ११६, सुखसागर को-ऑप हौ सो. राजाभाऊ देसाई मार्ग, प्रभादेवी मुंबई, यावर संपर्क साधावा आणि विशेषांकात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन संपादक सुमित वि. सातार्डेकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment