धुळवडीच्या रंगात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ......

धुळवडीच्या रंगात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल 
मुंबई / रमेश औताडे 

गोरेगाव पश्चिमेतील गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे धुळवडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी हजेरी लावून रंगांचा आनंद लुटला. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मंत्री पीयूष गोयल यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत गुलाल उधळून धुळवडीचा आनंद घेतला. रंगांचा उत्साह, ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गाण्यांच्या तालावर नृत्य करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या कार्यक्रमादरम्यान पीयूष गोयल यांनी सांगितले की, “होळी आणि धुळवड या सणांमुळे समाजात ऐक्य आणि बंधुभाव वाढतो. हा सण आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे.” तसेच त्यांनी मुंबईकरांना सणाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात उपस्थित नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पांढऱ्या कपड्यांवर गुलाल आणि रंगांची उधळण करत सर्वांनी एकत्रितपणे आनंदोत्सव साजरा केला.
कार्यक्रमाच्या अखेरीस लोकांसाठी जलपानाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही धुळवडीचा मोठा उत्सव पार पडला. केंद्रीय मंत्र्यांसह इतर मान्यवरांनी या सोहळ्यात सहभागी होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा