दिल्ली येथे 'नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड 2025' मध्ये सुनीता तुपसौंदर्य यांचा विशेष गौरव पुरस्कार
दिल्ली येथे 'नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड 2025' मध्ये सुनीता तुपसौंदर्य यांचा विशेष गौरव पुरस्कार
महिलांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी 'नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड 2025' चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा 9 मार्च 2025 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत न्यू महाराष्ट्र सदन, बडोदा हाऊसजवळ, नवी दिल्ली येथे पार पडणार आहे.
इंडियन गॅलक्सी इंटरनॅशनल व टीम झेनिथ इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात 'द फेम नॅशनल प्रिन्सेस ऑफ इंडिया' या राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेचा ग्रँड फिनाले देखील होणार आहे.
यावेळी महाराष्ट्रातील सायन कोळीवाडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सुनीता तुपसौंदर्य यांना विशेष सन्मान दिला जाणार आहे.सुनीता तुपसौंदर्य यांचे समाजकार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. महाराष्ट्रातील सायन कोळीवाडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथून त्यांनी समाजासाठी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्या खऱ्या अर्थाने समाजसेवेच्या प्रतीक ठरल्या आहेत.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे महिलांचे सबलीकरण, शैक्षणिक जागरूकता आणि सामाजिक समरसता यांना चालना मिळाली आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना सशक्त होण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 'नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड 2025' मध्ये त्यांना विशेष सन्मान मिळत आहे, ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.
सुनीता तुपसौंदर्य यांचे समाजकार्य हा अनेकांसाठी दीपस्तंभ असून, त्यांच्या जिद्दीने आणि सेवाभावी वृत्तीने समाजात सकारात्मक बदल घडत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
हा सोहळा विविध प्रतिष्ठित संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला असून, महिलांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाचा गौरव करण्याचा यामागील उद्देश आहे.
पी आर न्यूज नेटवर्क मिडिया
भारत सरकार नोंदणीकृत
7021777291
रमेश औताडे
Comments
Post a Comment