*अंथरुणाला खिळलेल्या २४ वर्षीय रुग्णाला मिळाले जीवनदान*

*अंथरुणाला खिळलेल्या २४ वर्षीय रुग्णाला मिळाले जीवनदान*

*मल्टीपल स्क्लेरोसिस ग्रासलेल्या रुग्णावर सेल-बेस थेरपीने यशस्वी उपचार*

*नवी मुंबई* : डॉ. प्रदीप महाजन(रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक) यांच्या नेतृत्वाखालील टीमने सेल-आधारित थेरपीचा वापर करून मल्टीपल स्क्लेरोसिस असलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यावर यशस्वी उपचार केले.

सांगली येथील सुशांत चव्हाण(२४वर्ष) अभियांत्रिकी विद्यार्थी, मल्टिपल स्क्लेरोसिसच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या परिणामांशी लढा देत होता. या आजाराविरुध्द सुरु असलेल्या लढाईमुळे रुग्णाचा प्रत्येक दिवस संघर्षमय ठरत होता. आजारामुळे रुग्ण अंथरुणाला खिळला, तसेच त्याला चालणे, बोलणे किंवा हलचाल करणे अशक्य होते. त्याला या अवस्थेत पाहून त्याच्या पालकांना चिंता वाटू लागली. रुग्णावर औषधोपचारही प्रभावी ठरत नसल्याने पालकांना आपल्या मुलांच्या प्रकृतीची काळजी वाटू लागली. त्यानंतर त्यांनी सेल बेस थेरेपीचा पर्याय निवडला. 

सुशांतचे परिवर्तन उल्लेखनीय होते. रुग्णालयात दाखल झाला तेव्हा हा रुग्ण अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत होता मात्र बाहेर पडताना तो स्वतःच्या पायावर उभा राहून आला. स्टेम सेल थेरपीने  तो आज स्वतःच्या पायावर उभा राहिला. न्यूरो-ट्रॉमानंतर सात वर्षे कोमात गेलेल्या नैरोबी येथील एयम सारख्या रुग्णांनाही जीवन बदलणारी पुनर्प्राप्ती अनुभवता आली.

*स्टेमआरएक्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप महाजन सांगतात की,* आमच्या सेल बेस  उपचारांमधून असे दिसून आले की जे पारंपारिक गोळ्या आणि थेरपीने बरे होऊ शकत नाहीत असे आजारही सेल बेस थेरेपीने यशस्वीरित्या व्यवस्थापित केले जाऊ शकतात. स्वयंप्रतिकारक रोग, कर्करोग, अनुवांशिक विकार, सेरेब्रल पाल्सी, मल्टिपल स्क्लेरोसिस, अँक्युलायझिंग स्पॉन्डिलायटिस, टाईप 1 डायबिटीज, ऑटिझम, डाउन सिंड्रोम आणि अशा अनेक रोगांमुळे रुग्णाच्या स्वतःच्या शरीरातून मिळणाऱ्या स्टेम पेशींची ताकद कमी होते.

मला नवे आयुष्य मिळवून दिल्याबद्दल मी डॉ. प्रदीप महाजन आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे. मल्टिपल स्क्लेरोसिससह जगणे अवघड होते, परंतु सेल-आधारित थेरपी माझ्यासाठी वरदान ठरले आहे. मी आता नव्या आत्मविश्वासाने माझ्या अभ्यासावर आणि स्वप्नांवर लक्ष केंद्रित करू शकतो अशी प्रतिक्रिया रुग्ण सुशांत याने व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा