जागतिक अकाली प्रसुती दिनासाठी जनजागृती
जागतिक अकाली प्रसुती दिनासाठी जनजागृती मुंबई / रमेश औताडे अकाली प्रसुती विषयी जागरूकता वाढवणे, नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांच्या कुटुंबांना योग्य ती माहिती मिळावी यासाठी जागतिक अकाली प्रसुती दिनाच्या पार्श्वभूमीवर मेडीकवर हॉस्पिटलने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळांना जन्मापासूनच अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या लहान बालकांना रेस्पिरेटरी सिंड्रोम, इंट्राव्हेंट्रिक्युलर ब्लीडींग, नेक्रोटाइझिंग एन्टरोकोलायटिस आणि दिर्घकालीन विकासाच्या समस्यांसह इतर गुंतागुंतीचा धोका असतो. यासाठी योग्य माहिती मिळावी यासाठी "बेबी फूट प्रिंट ऑफ करेज" चे अनावरण यावेळी केले. अकाली जन्माचे गंभीर स्वरूप ओळखून या लहान बालकांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम खूप चांगला आहे असे हॉस्पिटलचे डॉ तनमेश कुमार साहू यांनी सांगितले. यावेळी डॉ कल्पना गुप्ता म्हणाल्या, जागतिक प्रीमॅच्युरिटी डे आमच्यासाठी मुदतपूर्व बाळांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या यशस्वी लढाईचे कौतुक करण्याची संधी आहे. रुग्णालयाचे नवजात अतिदक्षता विभाग अत्...