मला लक्ष करून अराजक माजवण्याचा जागतिक कट -महंत श्री रामगिरी महाराज
मला लक्ष करून अराजक माजवण्याचा जागतिक कट -
महंत श्री रामगिरी महाराज
मुंबई / रमेश औताडे
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून अराजक मजविण्याचा जागतिक कट होता. मला कोणत्याही धर्माला, जातीला, पंथाला दुखवायचे नव्हते. आमच्या अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम समाजाचा अध्यक्ष होता. मुस्लिम समाजाच्या पंगती उठत होत्या. त्यामुळे मी सर्व समाजाला घेऊन जात आहे. जे ग्रंथात लिहिले आहे तेच मी वक्तव्य केले. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. अशी माहिती महंत श्री रामगिरी महाराज यांनी सोमवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी पोलीस आयुक्त व खासदार सत्यपाल सिंह उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणेकडून सखोल तपास करून कारस्थान रचणाऱ्या धर्माध देशद्रोही आणि सत्तालोलुप राजकारण्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी सत्यपाल सिंह यांनी यावेळी केली.
रामगिरी महाराज यांना जिहादच्या नावाखाली लक्ष करून अराजक माजवण्याचा जागतिक पातळीवर कट रचला गेला होता आणि त्यात परकीय शक्तींबरोबरच देशातील धर्माध शक्ती आणि सत्तेच्या हव्यासाने पछाडलेले राजकीय पक्ष सहभागी होते. असा खुलासा भोपाळ येथील सोशल मीडिया रिसर्च सेंटर या संशोधन संस्थेने समाज माध्यमांच्या संदर्भात केलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाला असल्याचा दाखला देत रामगिरी महाराज यांची भूमिका योग्यच होती व आहे असे मत सत्यपाल सिंह यांनी यावेळी व्यक्त केले.
ऑगस्ट महिन्यात महंत श्री रामगिरी महाराज यांच्या सुमारे दीड तास कालावधीच्या प्रवचनातील काही भागाचे संदर्भ वगळून तयार केलेल्या चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या हे योग्य नाही असे सांगत सिंह म्हणाले, 'गुस्ताख- ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा... यासारख्या घोषणा देत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये धर्माध लोकांनी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी दगडफेक करत राज्यात दंगकसदृश्य परिस्थिति निर्माण केली तसेच काही धर्माध व्यक्तींच्या तक्रारींची दखल घेऊन महंत श्री रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. हे योग आहे का ? असा सवाल सत्यपाल सिंह यांनी यावेळी केला.
Comments
Post a Comment