दलित पँथर चा राहुल नार्वेकर यांना पाठिंबा

दलित पँथर चा राहुल नार्वेकर यांना पाठिंबा 

मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे वादळ रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहता दलित पँथर या सामाजिक संघटनेने कुलाबा विधानसभेचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.

कुलाबा विभागातील दलित पँथर संघटनेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष (बेसिक) प्रताप रावत आणि राष्ट्रीय महा सचिव व महाराष्ट्र प्रवक्ता (बेसिक) अर्जुन सिंग यांनी त्याबाबतचा अधिकृत निर्णय नुकताच जाहिर केला आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी प्रताप रावत आणि अर्जुन सिंग यांना आदेश दिले आहेत की, विधानसभेतील निवडणुकीमध्ये मोठया प्रमाणात पूर्णतः पाठिंबा राहूल नार्वेकर यांना देण्यात यावा. त्याप्रमाणे विधानसभा निवडणूकीत  संघटनेचा जाहीर पाठिंबा भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राहूलजी नार्वेकर यांनी घोषित करण्यात येत आहे. 

स्थानिक आमदार राहिल्यापासूनच नार्वेकर यांचे दलित पँथरशी चांगले संबंध राहिले आहेत. राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी सामाजिक भूमिकेतून सहकार्य करण्याचे धोरण नेहमीच नार्वेकर करीत आहेत. त्यामुळेच या परिसरातून त्यांचा विजय निश्चित मानला जातो. पुढील कार्यकाळात देखील दलित पँथरला असेच सहकार्य करू असे आश्वासन नार्वेकर यांनी दिल्यामुळे हा पाठिंबा जाहिर करीत असल्याचे प्रताप रावत यांनी यावेळी जाहिर केले.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"