महात्मा बाब आणि महात्मा बहाऊल्लाह यांचा जन्मदिन
महात्मा बाब आणि महात्मा बहाऊल्लाह यांचा जन्मदिन
मुंबई / रमेश औताडे
जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या व बहाई धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या महात्मा बाब आणि महात्मा बहाऊल्लाह यांचा जन्मदिन नुकताच मुंबईत मरीन लाइन्स येथील बहाई सेंटर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बहाई समाजाचे लहान मोठे उपस्थित होते.
बहाई सेंटर च्या सेक्रेटरी नर्गिस गौर, ताहिरी गौर, मक्खीजा, झिया ईशराघी, चंद्रकांत बुटले, म्हावाश रोहानी, जया पुत्तरन यांनी देखील सामाजिक एकता, शांति, बंधुत्व, समता, धार्मिक विश्वास याबाबत आपले विचार व्यक्त केले.
हा समाज लोकसंख्येच्या तुलनेत अल्पसंख्याक असल्याने केंद्र सरकारची मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळाला नाही. तो मिळावा तसेच दफन भुमिसाठी जागा मिळावी. समाज केंद्र बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सेक्रेटरी नर्गिस गौर यांनी यावेळी केली.
Comments
Post a Comment