लेखक अशोकराव टाव्हरे यांच्या दोन्ही पुस्तकाचे नितीन गडकरी कडून कौतुक
लेखक अशोकराव टाव्हरे यांच्या दोन्ही पुस्तकाचे नितीन गडकरी कडून कौतुक
मुंबई / रमेश औताडे
लेखक अशोकराव टाव्हरे यांच्या " विकासाचा राजमार्ग" या पुस्तकाच्या तिसरी आवृत्तीचे व " हायवे ऑफ डेव्हलपमेंट" या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे लवकरच मुंबई येथे प्रकाशन होणार आहे. भारताचे भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन्ही पुस्तकासाठी शुभसंदेश पत्र पाठवत कौतुक केले आहे.
रस्ते विकास व महामार्ग खात्याचे कामकाज सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी या दोन्ही पुस्तकांचा फायदा झाला असल्याने लेखक अशोकराव टाव्हरे यांचे गडकरी यांनी कौतुक केले आहे. गडकरी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजयुमो, विधानपरिषद आमदार, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री हा प्रवास पुस्तकातून वाचकांपुढे टाव्हरे यांनी आणला आहे. नवीन आवृत्तींमध्ये सन २०२१ ते २०२४ मधील कार्याचा अंतर्भाव केला आहे. तसेच ऑनलाईन आवृत्तीही प्रकाशित करणार असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.
नवीन आवत्तींमुळे जनतेला संबंधित विषयाच्या माहितीचा महत्वपुर्ण स्त्रोत उपलब्ध होईल असे मत व्यक्त करून लेखक अशोकराव टाव्हरे यांना भविष्यातील वाटचालीसाठी सुयश मिळावे अशा शुभेच्छा नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत.
Comments
Post a Comment