उद्योग व्यवसायवाढीसाठी जागतिक परिषद
उद्योग व्यवसायवाढीसाठी जागतिक परिषद
मुंबई / रमेश औताडे
जागतिक स्तरावर उद्योगासाठी सहयोग, व्यावसायिक ज्ञानाची देवाणघेवाण आणि आर्थिक विकास वाढविण्यासाठी तसेच उद्योजक घडविण्यासाठी लोहाना इंटरनॅशनल बिझनेस फोरम ( LIBF) ने एक व्यासपीठ उपलब्ध केले असल्याची माहिती रविन ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय कारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गल्फ देशांमध्ये (कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती) व्यवसायाचा विस्तार करणे हे LIBF फोरमचे लक्ष आहे. २०२५ मध्ये दुबई येथे होणाऱ्या आगामी युरो एक्झिम बँक LIBF जी सी सी कॉलिंग २०२५ शिखर परिषदेची उद्दिष्टे आणि दृष्टीकोन याबाबत सतीश भाई विठलानी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कृपा चॅटन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी माहिती दिली.
युगांडातील फोरम च्या एका उद्घाटन कार्यक्रमात ३४ देशांतील ९५० हून अधिक प्रतिनिधी आले होते. परिणामी ३६ एम ओ यू आणि महत्त्वपूर्ण क्रॉस-बॉर्डर व्यवसाय झाले. गांधीनगरमधील आमच्या दुसऱ्या कार्यक्रमाने १२ हजाराहून अधिक उपस्थितांना आकर्षित केले, ज्यामुळे जागतिक व्यावसायिक संपर्क वाढला अशी माहिती सतीश भाई विठलानी यांनी दिली.
Comments
Post a Comment