भारतातील नाविक कामगारांचा एकता दिन संपन्न
भारतातील नाविक कामगारांचा एकता दिन संपन्न
मुंबई / रमेश औताडे
नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेच्या वतीने मस्जिद बंदर येथील सिमेंनस् हॉस्टेलच्या आगाशीवर नाविक कामगारांचा ६ नोव्हेंबर २०२४ रोजी एकता दिन संपन्न झाला. ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी शिव गोपाल मिश्रा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, कामगारांच्या अधिकाराचे रक्षण केले पाहिजे. कामगारांच्या हक्कासाठी योग्यवेळी लढावे देखील लागते. सद्य परिस्थितीत कामगार चळवळी समोर अनेक आव्हाने आहेत, त्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकजुटीने लढा द्यावा लागेल. भारतीय अर्थव्यवस्थेत नाविकांचे फार मोठे योगदान आहे.
नाविक कामगार व कुटुंबीयांसाठी नुसिने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. नाविक कामगारांना केव्हाही रेल्वे रिझर्वेशनची गरज लागल्यास मला किंवा मिलिंद कांदळगावकर यांना संपर्क साधा, आपले काम होईल . असे आश्वासन शिव गोपाल मिश्रा यांनी दिले.
नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या भाषणात सर्वांचे स्वागत करून, नाविक एकता दिनानिमित्त नाविकांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित आहेत,नाविकांच्या हितासाठी नुसिने अनेक कामगार कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, त्याचा नाविकांनी फायदा घ्यावा.
नाविक कामगारांच्या एकजुटीवर आम्ही कामगाराना वैद्यकीय आर्थिक सहाय्य, गरजू कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य, नाविक कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. नाविक कामगारांच्या एकजुटीवर अनेक प्रश्न सुटले आहेत.त्यापुढेही कामगारांच्या हक्कासाठी व कुटुंबासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. असे भावनिक आव्हान मिलिंद कांदळगावकर यांनी केले. याप्रसंगी मासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन एस. एम हलबे, इन्साचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल देवळी, इकसा असोसिएशनचे सेक्रेटरी कॅप्टन राकेश सिंग, फॉस्माचे संचालक कॅप्टन आर. वाय. बर्वे, नूसीचे अध्यक्ष ॲड. प्रेमानंद साळगावकर, न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष व सन्माननीय पाहुणे महेंद्र घरत यांची नाविकांचे हित, मालकांचे हित, नाविकांची सुरक्षा, नोकर भरतीसाठी असणारी दलालगिरी या प्रमुख विषयांवर मार्गदर्शनपर भाषणे झाली.
सभेचे सुंदर सूत्रसंचालन नुसीचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनिल नायर यांनी केले. आभार रॉड्रिक्स यांनी मानले. व्हाट्सअप चॅनेल “नुसी संवाद प्रसारण “चे उद्घाटन व नाविक कामगारांच्या मुलांचा गुणगौरव उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी कॅप्टन देवो, महेश यादव, डेव्हिड बिरवाडकर या मान्यवरांना नूसी एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नूसीचे संघटक चिटणीस सुरेश सोळंकी व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपाध्यक्ष लुईस गोम्स यांनी नवीन आयटीएफ इन्स्पेक्टर यांचा परिचय करून दिला. मनोरंजन म्हणून “ओंकार मेलडी “वाद्यवृद्द कार्यक्रम झाला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.
Comments
Post a Comment