राज्यात महायुतीची सत्ता येणार नाथाभाऊ शेवाळे
राज्यात महायुतीची सत्ता येणार नाथाभाऊ शेवाळे
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी राज्यव्यापी दौरा केला. १६ जिल्ह्यातील ३५ मतदार संघाच्या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार, यांच्या बैठका, संवाद, सभा, तसेच पत्रकार परिषद घेत कल जाणून घेतला असता राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याची माहिती नाथाभाऊ शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरकारने राज्यात राबविलेल्या लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना विज बिल माफी, सुशिक्षित तरुणांना रोजगार, परदेशी शिष्यवृत्ती शिक्षण योजना, वृद्ध पेन्शन योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, आरोग्य योजना, अशा विविध योजनांमुळे महायुतीच्या सरकारबद्दल जनतेमध्ये सहानुभूतीचे वातावरण असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्या आदेशाचे पालन करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन शेवाळे यांनी केले आहे. प्रदेश कार्याध्यक्ष सुरेंद्रकुमार वाजपेयी, मुंबई शहराध्यक्ष प्रभाकर नारकर, मुंबई कार्याध्यक्ष सलीम भाटी, उपाध्यक्ष सुहास बने, प्रदेश सरचिटणीस निलेश कंथारीया, रायगड जिल्हा अध्यक्ष भगवान साळवी, प्रदेश सरचिटणीस अॅड. बापूसाहेब देशमुख, मुंबई महिला अध्यक्ष ज्योती बढेकर, गुजराती सेल अध्यक्ष किरण सेठ, पुणे शहर अध्यक्ष नागेश पाटोळे, सह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment