जागतिक आरोग्य संघटनेचे निकष केराच्या टोपलीत


जागतिक आरोग्य संघटनेचे निकष केराच्या टोपलीत

मुंबई / रमेश औताडे

प्रत्येक नागरिकास योग्य आरोग्य सुविधा मिळावी असे जागतिक आरोग्य संघटनेचे निकष आहेत. मात्र मुंबई महानगरपालिका व राज्य शासन यांनी मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेताना जागतिक आरोग्य संघटनेचे निकष केराच्या टोपलीत टाकले असल्याने मुंबईकरांचे आरोग्य कसे खराब केले आहे याबाबतचा एक अहवाल प्रजा फाऊंडेशनने गुरुवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला.

2018-19 ते 2024-25 या सात वर्षांत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्याचे बजेट रू. 3,637 कोटी वरून रू. 7,191 कोटी झाले आहे. गेल्या दशकात मुंबई महानगरपालिका दवाखान्यातील आरोग्य कर्मचा-‌यांची कमतरता तिप्पट झाल्याचे आढळून आले आहे.
दर 15000 लोकसंख्येमागे एक दवाखाना पाहिजे असा शहरी आणि प्रादेशिक विकास योजना आखणी आणि अंमलबजावणी (URDPFI) दंडक असून 2023 पर्यंत त्याची पूर्तता मुंबईतील एकाही वॉर्डमध्ये झालेली नाही असे या अहवालात स्पष्ट केले आहे.

डायरिया/अतिसार, टीबी, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि डेंग्यू  हे आजार मधुमेह, श्वसनाचे गंभीर आजार, टीबी आणि उच्च रक्तदाब यामुळे झाले आहेत. मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवा, मुख्य आजारांचा प्रादुर्भाव, श्वसनाचे आजार आणि कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची  संख्या या अहवाल आहे. जीवनशैलीशी निगडित मधुमेहासारख्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 2014 मध्ये 2,428 होती, जी 2022 पर्यंत 14,207 झाली आहे. मृत्यूसंख्येत वाढ झाली असून आता मृत्यूच्या कारणांमध्ये मधुमेह सर्वात वरचे कारण ठरत आहे. अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे सीईओ मिलिंद म्हस्के यांनी सांगितली.

नागरिकांचे आरोग्य, स्वास्थ्य आणि शारीरिक हालचालींकरिता किमान 10 चौरसमीटर खुली जागा उपलब्ध असली पाहिजे. मात्र मुंबई विकास आराखडा (2014-2034) मध्ये केवळ 3 चौमी खुली जागा प्रस्तावित केली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. 2019 ते 2022 या काळात श्वसनाच्या गंभीर आजारामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 33,711 आहे, तर 16,345 जणांचे मृत्यू टीबीमुळे झालेले आहेत.

.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"