भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय मंत्री बाबूभाई पटेल यांचा महाराष्ट्र दौरा

भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय मंत्री 

बाबूभाई पटेल यांचा महाराष्ट्र दौरा

शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आढावा

मुंबई / रमेश औताडे 

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 


भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रांत संपर्क अधिकारी बाबूभाई पटेल , सुभाष महाजन तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते,बाबूभाई पटेल यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना,

सध्या मी  महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बैठका, शेतकरी संवाद आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्र प्रांतातील २५ जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे असून सध्या दौऱ्याचा अंतिम टप्पा सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील कार्यकारिणी बैठकीपासून या टप्प्याची सुरुवात झाली असून मुंबईनंतर पालघर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांचा दौरा केला जाणार आहे.ते म्हणाले की, १३ व १४ जून रोजी पुणे येथे भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 

या बैठकीला संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. साई रेड्डी तसेच अखिल भारतीय सहसंघटन मंत्री गजेंद्रसिंह उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील कार्यकर्ते या बैठकीत सहभागी होऊन संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतील.पत्रकार परिषदेत बोलताना पटेल यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अंतर्गत धान खरेदीतील अडचणी, तसेच एमआयडीसी व इतर प्रकल्पांच्या माध्यमातून होत असलेल्या जमीन अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी संघाच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व प्रश्नांवर पुण्यातील कार्यकारिणी बैठकीत सविस्तर चर्चा होणार असून आवश्यक असल्यास शेतकरी हितासाठी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.भारतीय किसान संघाच्या संघटनात्मक विस्ताराबाबत बोलताना पटेल म्हणाले की, संघ स्थापनेची ५० वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात व्यापक अभियान राबवले जात आहे. एक लाख गावांपर्यंत संघटन पोहोचवणे आणि एक कोटी सदस्य नोंदविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.गेल्या ५० वर्षांत भारतीय किसान संघाने तळागाळातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले असून आज ग्राम समितीपासून राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत संघटनेचे मजबूत जाळे उभे राहिले आहे. 

त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध समस्या प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. पीएम किसान सन्मान निधी, शेतकरी नोंदणी, बिनव्याजी पीककर्ज योजना, व्याज सवलती तसेच विविध शासकीय योजनांमधील त्रुटींबाबत संघ सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.या पत्रकार परिषदेला भारतीय किसान संघाचे मुंबई विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री