मेघमल्हार सोसायटीत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर
रमेश औताडे / 23 जानेवारी 2026
मेघमल्हार सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष श्री. तुषार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, 24 जानेवारी 2026 रोजी सोसायटीत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोसायटीतील सर्व सभासद व रहिवाशांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, साखर आदी प्राथमिक तपासण्या करण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांसाठीही ही तपासणी उपयुक्त ठरणार आहे. शिबिराची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे हे शिबिर पार पडणार आहे.
अध्यक्ष तुषार नाईक हे नेहमीच सोसायटीच्या सामाजिक उपक्रमांसाठी पुढाकार घेत असतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्याशी संबंधित उपक्रम राबवण्यात येत असल्याने रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या निमित्ताने सोसायटीतील सदस्य एकत्र येऊन अध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार असून, त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणार आहेत.
मेघमल्हार सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने सर्व रहिवाशांनी वेळेत उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment