नवउद्योजकांसाठी सरकारच्या योजना खूप महत्वाच्या

  नवउद्योजकांसाठी सरकारच्या योजना महत्वाच्या - 
     आमदार डॉ. अशोकराव माने यांची माहिती
मुंबई / रमेश औताडे 

राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना या नवउद्योजकांसाठी उत्तम असून आपण मेक इन इंडियाचे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हातकणंगले येथील जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी केले.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स फॉर इन्कलुसिव बिझनेस अँड इंडस्ट्री यांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक शिखर परिषद नॅशनल स्टॉक एक्सचेंज वांद्रे येथे आयोजित केली होती त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते.

शासनाच्या नवउद्योजक योजना कागदावर राहू नये यासाठी मी कायम कार्यरत राहिलो याचे फळ  मला माझ्या मतदारांनी विधीमंडळात पाठवून दिले असेही ते पुढे म्हणाले. चेंबरने राज्यातील २२५ उद्योजकांना एकत्र आणून जे कार्य केले आहे तसे कार्य माझ्या मतदार संघातही व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
यावेळी गुरदित सिंग व्होरा (उपाध्यक्ष, भागीदारी आणि संसाधने, राष्ट्रकुल युवा परिषद), राज सुखेजा, (सीईओ : रेड मॅमथ वेंचर्स), श्रीमती श्वेता महाले (आमदार चिखली विधानसभा), डॉ. संतोष कुमार मल्लिक (कार्यकारी संचालक, मानव संसाधन, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड), रत्नाकर गजरे (चेंबरचे वरिष्ठ रणनिती सल्लागार) व प्रा. हेमंत सुधाकर सामंत (चेंबरचे वरिष्ठ धोरण सल्लागार) यांनी या परिषदेच्या उद्घाटन सत्रात मार्गदर्शन केले.
 
चेंबरचे अध्यक्ष डॉ. गिरीश इंगळे यांनी परिषदेबाबत प्रास्ताविकात चेंबरच्या आजवरच्या कामाची माहिती देत सर्व उपस्थित नवउद्योजकांना चेंबरची एक वर्षाची फी सवलत म्हणून जाहीर करत महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाांत अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही दिली. 

दुपारच्या सत्रात रवींद्र जाधव, कमलेश मालती, अरुण केदारे, कुंदन गुरव, एस. के. गोयल, हेमंत हलोई, जयेश खाडे यांनी आपल्या अनुभवातून उद्योजकता वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉर्पोरेट लॉयर अँड. रोहिणी जाधव यांनी केले. सांगता समारंभानंतर उपस्थित उद्योजकांनी आपला उद्योग कसा सुरू केला आणि काय अडचणी आल्या याबाबत आपले विचार व्हिडिओ माध्यमातून चेंबरकडे व्यक्त केले. उद्योग संकल्पना ते आपला स्वतःच्या उद्योगाचा आयपीओ काढेपर्यंत सर्व विषयावर बहुमोल मार्गदर्शन झाले असे मत सहभागी प्रदीप जानकर यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा