सरकारीच्या मनमानी कारभारविरोधात अशोकराव टाव्हरे आक्रमक
सरकारी यंत्रणेच्या मनमानी कारभारविरोधात आंदोलन
मुंबई / रमेश औताडे
जनतेची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना वाढतच असताना, आता सरकारी यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक काम न केल्याने सामान्य माणसांची जमीन विक्री व्यवहारात फसवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर फसवणूक झालेल्या प्लाॅटधारकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आंदोलकांना दहा दिवसात उपविभागीय अधिकारी खेड यांच्याकडून अहवाल घेत न्याय दिला जाईल असे सांगितले असता हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. अटी शर्ती चा भंग केला तहसीलदारांनी, शिक्षा मात्र प्लाॅटधारकांना का ? असा सवाल टाव्हरे यांनी केला आहे.
चांडोली,ता.खेड.जि.पुणे येथील जमीन गट नं १२६ मधील १ हेक्टर २४ आर क्षेत्र २० ऑगस्ट २०२४ रोजी सरकारजमा करण्याचा आदेश तहसीलदार खेड ज्योती देवरे यांनी पारित केला आहे. अटी शर्ती चा भंग तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आमले म्हणजेच शासनाने केला असताना शिक्षा प्लाॅधारकांना का ? हा कोणता न्याय ? असा सवाल आंदोलनकर्ते करत आहेत.
भोगावटा २ वर्ग, महार वतनाची जमीन जिल्हाधिकारी पुणे कुळकायदा शाखेची रितसर परवानगी घेऊनच हे जमिनीचे व्यवहार झाले होते. भोगावटादार वर्ग १ मध्ये जमीन रूपांतरित झाल्याने नागरिकांनी प्लाॅट खरेदी केले आहेत. काहींनी घराची बांधकामे केली आहेत. मात्र अटी शर्ती भंग झाल्याचा दावा करून एका व्यक्तीने तक्रार केली असता प्लाॅधारकांना भुर्दंड सोसावा लागत आहे असे टाव्हरे यांनी सांगितले. दहा दिवसात न्याय मिळाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.
Comments
Post a Comment