महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महाअधिवेशन


मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २० जून शनिवारी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव येथील आदिती लॉन्स येथे राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली.

या महाअधिवेशनाला राज्यभरातील सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अधिवेशनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणे, बहुसंख्य कामगारांना डीसीपीएस योजनेअंतर्गत पेन्शन योजना लागू करणे, १० टक्के आरक्षणाबाबत नियमित भरती प्रक्रिया राबविणे, तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर शासनाने मंजुरी देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवर येणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित शक्तीचे प्रदर्शन घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित या महाअधिवेशनात सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आले आहे. असे राज्य सचिव अशोक कुथे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश