खरंतर धर्मांतराचा अर्थ काय आहे हे यांना माहिती नाही - महेंद्र कांबळे ( बबन कांबळे) , ॲड विल्सन गायकवाड यांची पत्रकार परिषदेत माहिती

खरंतर धर्मांतराचा अर्थ काय आहे हे यांना माहिती नाही - 

महेंद्र कांबळे ( बबन कांबळे) , ॲड विल्सन गायकवाड यांची पत्रकार परिषदेत माहिती


मुंबई / पी आर न्यूज 


गेले तीन महिन्यापासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काही लोक आमच्या प्रार्थना स्थळावर हल्ला करत आहेत. हल्ला करणारे एकच ग्रुप आहे त्यांचा आरोप आहे की प्रार्थना स्थळामध्ये धर्मांतर होत आहे खरंतर धर्मांतराचा अर्थ काय आहे हे यांना माहिती नाही. अशी माहिती बबन कांबळे, एड. विल्सन गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.


धर्मांतर म्हणजे एखादी व्यक्ती  जिल्हा अधिकारी / कलेक्टर यांच्याकडे जाऊन शपथपत्र देऊन व कायदेशीर रित्या ही गोष्ट करतो की, मी आज पासून माझा धर्म सोडून इतर धर्म स्वीकारत आहे. आमच्या प्रार्थना स्थळांमध्ये अशी कोणतीही प्रक्रिया होत नाही आमच्या प्रार्थना स्थळांमध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर आस्था ठेवणारे लोक असतात. आस्था ठेवणे म्हणजे धर्मांतर नाही कोणत्याही देवी देवतावर आस्था ठेवणे म्हणजे धर्मातर नाही विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने देखील एका खटल्यामध्ये असे म्हटले आहे की आस्था ठेवणे म्हणजे धर्मांतर नाही.

 परंतु काही लोक दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी वागणूक करत आहे ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सत्ता आहे अशा राज्यामध्ये असे प्रकरण वाढत आहेत आम्ही या संदर्भामध्ये जवळपास सहा पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली आहे परंतु आज पर्यंत यावर कोणतीही अद्याप कारवाई झाली नाही. 12 एप्रिल रोजी वसई अचोले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अंकित यादव राहणार सांताक्रुज मुंबई यांनी त्या ठिकाणी बेकायदेशीरx जमाव जमवून एका प्रार्थना स्थळावर हल्ला केला. अंकित यादव व त्याच्या साथीदारादर कारवाई करण्याऐवजी आमच्याच लोकांवरती नरबळी, जादूटोणा तसेच इतर धार्मिक लोकांची भावना दुखावणे असे प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. 

वास्तविक पाहता प्रार्थना चालू असताना त्या ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून प्रार्थना स्थळामध्ये विना परवाना घुसून मारहाण केली आहे. प्रार्थना स्थळामध्ये काय चाललं आहे काय नाही हल्ला करणाऱ्यांना माहितीच नाही अशा प्रकारचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. माझा प्रश्न असा आहे की, प्रार्थना सभेमध्ये काय चालले आहे हे न पाहता इतर धर्माचे धार्मिक भावना दुखावले कोणी बघितलं किंवा त्या ठिकाणी काळी जादू चालू होती किंवा तसा प्रकार चालू होता, हे कोणी बघितलं याचा काय पुरावा आहे परंतु त्या ठिकाणचे स्थानिक आमदार यांच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केली याबाबत आम्ही वंचित बहुजन आघाडी चे भिवंडी शहराध्यक्ष यांनी देखील तक्रार केली आहे. 

परंतु आजपर्यंत अंकित यादव व त्याच्या साथीदारावर कारवाई करण्यात आली नाही. सांताक्रुज येथे देखील अंकित यादव विरोधात तक्रार करण्यात आली आहे विशेष म्हणजे जर एखाद्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार चालू असेल तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे परंतु अंकित यादव व त्याच्या सहकारी स्वतः येऊन क्रिस्ती लोकांवर हल्ला करत आहे व अनेक वृत्त पत्रामध्ये धर्मांतराचा कट उधळला अशी बातमी येत आहे काही चौनल मध्ये देखील अशा बातम्या येत आहेत माझी सर्व न्यूज चॅनल्स व वृत्तपत्र याला विनंती आहे शहानिशा करून बातमी प्रसिद्ध करण्यात यावी एखाद्या ठिकाणी आमच्या प्रार्थना सभा वरती कोणीतरी हल्ला करतो पोलीस त्या ठिकाणी येतात प्रार्थना स्थळ वरील काही प्रमुख लोकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येत आहे तिथे कोणतरी एक माणूस तक्रार करतो की माझा ह्याने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस त्याची शहानिशा न करता आमच्या लोकावर गुन्हा दाखल करत आहेत. उदाहरणार्थ मालाड येथे 10 मे रोजी अंकित यादव व त्यांचे सहकारी आमच्या एका प्रार्थना स्थळावरती जाऊन हल्ला केला पोलिसांना बोलावले पोलीस त्या ठिकाणी आले आमच्या लोकांना पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले. सकाळी 11 वाजता आमच्या लोकांना पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले रात्री 11 नंतर एका महिलेने अशी तक्रार केली की उषा गुप्ता या महिला त्यांच्या घरी आठ मे रोजी सुमारे तीन वाजता घरी गेल्या होत्या त्यांच्याकडे पाणी मागितलं व त्याला म्हणाले की मी तुमच्यासाठी प्रार्थना करते अशी तक्रार मालाड पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आमच्याकडे पुरावा आहे की ही तक्रार खोटी आहे 8 मे सुमारे तीन च्या दरम्यान उषा गुप्ता या त्यांच्या राहत्या घरी होत्या तसा पुरा आमच्याकडे आहे आणि तो आम्ही कोर्टात सादर करणार आहोत आज पर्यंत आमच्या लोकांच्या अनेक तक्रारी झाल्या परंतु संपूर्ण देशभरामध्ये कुठेही धर्मांतराच्या बाबतीत शिक्षा झाली नाही किंवा सिद्ध झाले नाही याचा अर्थ असा की धर्मातर हा प्रकार होतच नाही आजच्या या आधुनिक युगामध्ये जबरदस्ती किंवा आमिष दाखवून धर्मातर होऊ शकत नाही परंतु खोट्या तक्रारी लोक करत आहेत.

आज पासून आम्ही असे ठरवले आहे की, खोट्या तक्रारी करणाऱ्यांच्या विरोधामध्ये अनु नुकसानी/मानहानी दावा आम्ही करणार आहोत तसेच जे लोक आमच्या प्रार्थना हल्ला करत आहेत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग गृह विभाग यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहोत. वेळ पडल्यास आम्ही कोर्टात जाणार आहोत, तसेच या अन्याया विरोधामध्ये 5 जून रोजी आझाद मैदान येथे निदर्शन करणार आहोत. एक गोष्ट आमच्या लक्षात आलेली आहे की ज्या ठिकाणी हल्ला होतो व आमच्यावरती तक्रार करण्यात येते. प्रत्येक ठिकाणी कोणीतरी एकच माणूस तक्रार करत असतो असे निदर्शनास आले आहे.

3 मे रोजी कणकवली येथे आमचे बंधू अतुल भोरे यांच्या प्रार्थना स्थळावरती काही लोक आले आणि इथे काय चालू आहे ? सगळे पुस्तका कॅलेंडर तपासले व इथे धर्मातर चालू असा आरोप केला संध्याकाळपर्यंत एका व्यक्तीला आणले त्या व्यक्तीने तक्रार केली की, हे माझं या ठिकाणी धर्मांतराचा प्रयत्न चालू आहे व आमच्या माणसावर गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या दिवशी बातमी आली या ठिकाणी धर्मांतराचा कट चालू होता तो उधळण्यात आला. वास्तविक मी पुन्हा सांगतो की, प्रार्थना करणे म्हणजे धर्मातर नाही, आस्था ठेवणे म्हणजे धर्मांतर नाही. अशी माहिती बबन कांबळे, एड. विल्सन गायकवाड यांनी अशी माहिती दिली.


 

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री