छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीराची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्राचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राज्यात गेली दोन महिन्यापासन मंडलस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न होत आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातही उपविभागीय अधिकारी,प्रांत अनिल दौंडे ,तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनानुसार मंडलस्तरीय शिबीरे आयोजित केली गेली.प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या समस्यापूर्तीसाठी प्रशासनाने केलेली कार्यवाही याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री,महसुलमंत्री,महसुल सचिव,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन पाठवून आभार मानले आहेत.
७ मार्च रोजी कनेरसर येथील शिबिरास टाव्हरे उपस्थित होते.नागरिकांना विविध प्रक्रारचे दाखले त्वरित दिले जात होते,तक्रारींचे निरसन केले जात होते. खेड तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी निवारणार्थ उपविभागीय अधिकारी,प्रांत अनिल दौंडे,तहसीलदार प्रशांत बेडसे,उप अधिक्षक भुमी-अभिलेख नितीन सुर्यवंशी,नायब तहसीलदार रवींद्र मोरे,, चेतन मोरे,राम बीजे,अभिलेख कक्ष प्रमुख निलेश घोडके,सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी शिबिराच्या माध्यमातून "महसुल प्रशासन आपल्या दारी" ही लोकाभिमुख संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे.
सध्या फार्मर आयडी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने काढावे लागत आहे.साबळेवाडी ता.खेड येथील श्री अंबिका देवस्थान ट्रस्टचे मा.अध्यक्ष एकनाथ साबळे व त्यांचे बंधु रायबा साबळे यांचे फार्मर आयडी ॲप्रुव्हल एक महिना झाले नव्हते,याबाबत टाव्हरे यांनि तहसीलदार खेड ,प्रशांत बेडसे यांना माहिती पाठविली असता,त्यांनी तातडीने कार्यवाही करून ॲप्रुव्हल प्रक्रीया पुर्ण केली.
उपविभागीय अधिकारी,अनिल दौंडे हे तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख आहेत.अपिल सुनावण्या,विविध प्रशासकीय मिटींग,भुसंपादन अधिकारी अशा महत्वपुर्ण जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही ते समस्या निवारणार्थ मोलाचे मार्गदर्शन करीत असतात.नागरिकांच्या तक्रारींबाबत सकारात्मक दृष्टिकोनातून न्याय देतात याचा अनुभव अनेकदा आल्याचे टाव्हरे यांनी सांगितले आहे.काही वेळा प्रश्न प्रलंबित राहिले तर आंदोलनेही केली,परंतु उपविभागीय अधिकारी,प्रांत अनिल दौंडे साहेब,तहसीलदार प्रशांत बेडसे साहेब यांनी मागण्यांबाबत सकारात्मकता दाखविली.
विविध प्रश्नी महसुलमंत्री बावनकुळे साहेबांना भेटलो असता तत्परतेने दखल घेतात.त्यांचे ओएसडी निलेश शिंगी यांनीही अनेकदा संबधित अधिकारी यांना फोन करून प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले,त्यातून अनेक गोर गरिबांच्या समस्या मार्गी लावता आल्या.उपअधिक्षक भुमी-अभिलेख नितीन सुर्यवंशी,नायब तहसीलदार रवींद्र मोरे,चेतन मोरे,तहसील कार्यालय रेकॉर्ड प्रमुख निलेश घोडके व सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून खेड तालुक्यात तहसीलदार व प्रांत यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभावी कामगिरी केली त्याबद्दल टाव्हरे यांनी पत्राद्वारे आभार मानले आहे.
Comments
Post a Comment