केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्राने लेखकाचे कौतुक


मुंबई / रमेश औताडे 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कवी-लेखक अशोकराव टाव्हरे यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा पत्र पाठविले आहे. गडकरी यांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग व इंग्रजीत हायवे ऑफ डेव्हलपमेंट ही टाव्हरे यांची पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच वलय,कोरोनाच्या आठवणी हे कवितासंग्रह, स्वातंत्र्योत्तर भारत हा लेखसंग्रह ही प्रकाशित आहे. तसेच अनेक स्मरणिकांचे टाव्हरे यांनी संपादन केले आहे. 

वर्तमानपत्रांतून विविध विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहे. मुंबई येथे संपन्न झालेल्या पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाचे  टाव्हरे स्वागताध्यक्ष होते. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी समाजाच्या प्रश्नी साहित्याच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे काम कवी-लेखक करीत असून टाव्हरे यांना लेखणीचे बळ अधिक लाभो व सामाजिक कार्य व्यापक व्हावे अशी सदिच्छा पत्राद्वारे व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील गडकरींसारख्या मोठ्या नेत्याने अशोकराव टाव्हरेंना वाढदिवसानिमित्त आवर्जून पाठविलेल्या शुभेच्छांबद्दल विविध स्तरांवर कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

विरारमध्ये विरार रन २०२५ चे आयोजन

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर