Posts

Showing posts from May, 2025

मुख कर्करोग दिनानिमित जनजागृती अभियान

Image
             मुख कर्करोग दिनानिमित जनजागृती अभियान मुंबई / रमेश औताडे  तंबाखूचे सेवन आता वैयक्तिक राहिले नसून एक राष्ट्रीय आरोग्य संकट बनले आहे. तोंडाच्या कर्करोगाच्या जगातील एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत. दरवर्षी ७७ हजार नवीन रुग्णाचे निदान होते व ५२ हजार लोकांचा मृत्यू होतो. तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांचा जगण्याचा दर फक्त ५० टक्केच आहे. यावर उपाय म्हणून तंबाखू सेवन बंद करावे व वेळोवेळी तोंडाची तपासणी करून घ्यावे. अशी माहिती जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर अपोलो हॉस्पिटलचे डॉ.अनिल डी क्रूझ यांनी सांगितले. तंबाखूच्या व्यसनातून बरे होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना या तंबाखू मुक्त अभियानातून मदत मिळेल असे सांगत अरुणेश पुणेथा म्हणाले, धूररहित तंबाखू, सुपारी आणि अल्कोहोल यांचा एकत्रितपणे वापर करणे खूप घातक आहे. तोंडाचा कर्करोग लवकरात लवकर समजून आल्यास बरा होऊ शकतो असे किरण शिंगोटे यांनी सांगितले. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला तंबाखू सेवन करणाऱ्यांनी तपासणी करून घ्यावी. वारंवार होणारा अल्सर, ...

मातंग समाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
मातंग समाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई / रमेश औताडे  मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या व उपवर्गीकरण या विषयावर आझाद मैदानात राज्यस्तरीय महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाची दखल सरकारने घेतली असून  मंत्रालयीन स्तरावर एक बैठक घेऊन या समाजाला न्याय देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.  महाआक्रोश मोर्च्यात खेड्यापाड्यातून आलेल्या राज्यातील हजारो मातंग बांधवांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे समाज बांधवांनी आनंदी भावना व्यक्त केल्या होत्या.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मातंग स्वाभिमान संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देत संघटनेचे राष्ट्रीय नेते दिलीप भाऊ यादव, रमेश दोडके, गजाननराव वानखेडे, राजीव मानकर , सीताबाई चांदणे,समाधान सावळे , अनिल सुरळकर , सचिन चांदणे यांनी आभार...

सन्मानजनक मानधनासाठी ज्युनिअर आर्टिस्ट आक्रमक

Image
      सन्मानजनक मानधनासाठी ज्युनिअर आर्टिस्ट आक्रमक मुंबई / रमेश औताडे  चित्रपट आणि मालिका क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी अत्यल्प मानधनाविरोधात आवाज उठवला आहे. आम्ही वर्षानुवर्षे फारच कमी मोबदल्यावर काम करत आहोत. आम्हाला किमान सन्मानजनक मानधन मिळावे व " फिल्म वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉय " च्या संभाव्य निवडणुका कायद्याप्रमाणे पार पाडाव्यात अशी आमची मागणी आहे. असे ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन चे समिती प्रमुख सल्लागार ॲड यशवंत गंगावणे व अतुल मानकामे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कलाकारांनी सांगितलं की, "आमचं योगदान संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेसाठी अत्यावश्यक असते. मोठे निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून आम्हाला मानधनाची वेळेवर अंमलबजावणी होत नाही. असे अध्यक्ष अरविंद सकट, सचिव वसीम बेग, खजिनदार सरफुद्दीन शेख यांनी सांगितले. सरकारकडे आणि कामगार कल्याण मंडळाकडे देखील हस्तक्षेप करण्याची मागणी यावेळी उपाध्यक्ष गफूर शेख, सहसचिव तोसिफ शेख यांनी केली. "आम्ही केवळ प्रसिद्ध चेहरे नाही...

नवउद्योजकांसाठी सरकारच्या योजना खूप महत्वाच्या

Image
  नवउद्योजकांसाठी सरकारच्या योजना महत्वाच्या -       आमदार डॉ. अशोकराव माने यांची माहिती मुंबई / रमेश औताडे  राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना या नवउद्योजकांसाठी उत्तम असून आपण मेक इन इंडियाचे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हातकणंगले येथील जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी केले. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स फॉर इन्कलुसिव बिझनेस अँड इंडस्ट्री यांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक शिखर परिषद नॅशनल स्टॉक एक्सचेंज वांद्रे येथे आयोजित केली होती त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. शासनाच्या नवउद्योजक योजना कागदावर राहू नये यासाठी मी कायम कार्यरत राहिलो याचे फळ  मला माझ्या मतदारांनी विधीमंडळात पाठवून दिले असेही ते पुढे म्हणाले. चेंबरने राज्यातील २२५ उद्योजकांना एकत्र आणून जे कार्य केले आहे तसे कार्य माझ्या मतदार संघातही व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.   यावेळी गुरदित सिंग व्होरा (उपाध्यक्ष, भागीदारी आणि संसाधने, राष्ट्रकुल युवा परिषद), राज सुखेजा, (सीईओ : रेड मॅमथ व...

घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Image
          घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात मुंबई / रमेश औताडे  रहिवाशांचा विरोध डावलत कायद्याचे पालन न करता नागरी वस्ती जवळ तयार केलेल्या घनकचरा प्रकल्पामुळे मुळे भर पावसात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजारी पडणाऱ्या उग्र दुर्गंधीमुळे अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत योग्य त्या उपाय योजना करून नागरिकांना आधार द्यावा व त्यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवावे. अशी मागणी " ला शिमर " या  वसाहतीतील नागरिकांनी केली आहे. मिरा-भाईंदर महापालिकेने नागरी वस्तीपासून घनकचरा प्रकल्प उभारला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार अशी कचऱ्याची डंपिंग ग्राउंड किमान २०० मीटर दूर असला पाहिजेत. डम्पिंग ग्राउंड जवळील वसाहतीतील रहिवाशांचा विरोध डावलून हा प्रकल्प उभारला असून त्याच्या दुर्गंधीने लोक हैराण झाले आहेत. काही रहिवासी घरे सोडून दुसरीकडे राहायला गेले आहेत.  महापालिकेने नियम धाब्यावर बसवून ४० मीटर उंच प्रकल्प उभारला आहे.पावसाळ्यात समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यामुळे या प्रकल्पाचे पत्रे उडून जात असून मोठी दुर्घटना होऊ शकते. ...

रत्नागिरी जिल्ह्याला माई रमाई च्या नावाची मागणी

Image
      रत्नागिरी जिल्ह्याला माई रमाई च्या नावाची मागणी मुंबई / रमेश औताडे  राज्य शासनाने औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर केले. त्याच धर्तीवर आता त्यागमुर्तीं माई रमाई आंबेडकर यांचे नाव रत्नागिरी जिल्ह्याला देऊन त्यांचा शासनाने सन्मान करावा अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे नेते रामभाऊ वाहणे यांनी केली आहे. प्रमुख वक्ते नामदेवराव निकोसे यांनी माई रमाई ची जिवन गाथा सांगितली तेव्हा श्रोत्यांना अश्रू अनावर झाले होते. रत्नागिरी जिल्ह्याला माई रमाई चे नाव देण्यात यावे या करिता लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळ भेटून निवेदन सादर करण्यात येईल असे आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. शहराध्यक्ष प्रा.रमेश दुपारे, मनोहर इंगोले,सुरज ढोणे, पुण्यशील बोदले, चरणदास गायकवाड, अभिषेक मिश्रा, राहूल त्रिवेदी, भागनबाई मेश्राम, महानंदा इलमकर, संगिता वासनिक, रोहीत पांडे, शालिक बांगर, मामासाहेब मेश्राम, राजु पांजरे यावेळी उपस्थित होते.

महिला मृत्यू प्रकरणी पालिके विरोधात मनसे आक्रमक

Image
      महिला मृत्यू प्रकरणी पालिके विरोधात मनसे आक्रमक मुंबई / रमेश औताडे  महानगरपालिका रुग्णालयात रुग्णांच्या अनेक तक्रारी वाढल्या असतानाच एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याने डॉक्टर, प्रशासन व कर्मचारी यांच्या कर्तव्याबाबत प्रश्नचिन्ह झाले आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या निष्काळजी कारभारावर मनसे स्टाईल आंदोलन करत प्रशासन, डॉक्टर, कर्मचारी यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र पोलिस व पालिका आयुक्त या प्रकरणी गंभीर नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई विभाग अध्यक्ष सागर विचारे यांनी केला आ संगीता खरात यांचा मृत्यू सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं निर्घृण अपयश आहे. त्यांची प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर योग्य डॉक्टर उपलब्ध का झाले नाहीत ? नर्सिंग स्टाफने वेळेत माहिती दिली का ?  वेळेत माहिती दिली असेल तर, डॉक्टरांना विलंब का झाला ? असे सवाल सागर विचारे यांनी केले आहेत. पालिकेच्या उपचारातील त्रुटीमुळे संगीता खरात यांना खाजगी रुग्णालयात शिफ्ट केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल दोन लाख हुन जास्त रुपयांचं बिल वसूल क...

जनतेचे आरोग्य सरकारी आश्वासनाच्या दावणीला

Image
        राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब्सचा सुळसुळाट सुरूच  मुंबई / रमेश औताडे  मागील पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी बोगस पॅथॉलॉजी लॅब्स लवकरच बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता हिवाळी अधिवेशन महिन्याभरात सुरू होईल. मात्र मागील अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांचे घोंगडे तसेच भिजत पडल्याने आजही राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब्सचा सुळसुळाट सुरूच आहे. सरकारने जनतेचे आरोग्य आश्वासनाच्या दावणीला बांधल्याने राज्यातील जनतेच्या आरोग्याचा खेळ सुरूच आहे. सरकारकडून आरोग्य धोरणात जोरदार घोषणा करण्यात येत असताना प्रत्यक्षात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या लॅब्सवर कारवाई होताना दिसत नाही. पॅथॉलॉजी लॅब संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदिप यादव यांनी सरकारकडे या लॅब्सना त्वरीत बंदीची मागणी करत स्पष्ट केले की, सरकारकडून केवळ अधिवेशनात आश्वासने दिली जातात, प्रत्यक्षात काहीच ठोस कृती केली जात नाही. डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नॉन-ऑलोपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांनाच लॅब चालवण्याची परवान...

एक हजार मांजरांना एकाच वेळी पाहण्याची संधी

Image
         एक हजार मांजरांना एकाच वेळी पाहण्याची संधी मुंबई / रमेश औताडे  प्राणी प्रेमींसाठी नवी मुंबई वाशी येथील सिडको प्रदर्शन सेंटर येथे २५ मे रोजी  रविवारी एक 'कॅट शो' रंगणार असून  विविध प्रजातीच्या हजारपेक्षा जास्त मांजर मांजरी पाहण्याची संधी मांजर प्रेमीना मिळणार असल्याची माहिती आयोजक फिलाइन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकिब पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.  जागतिक दर्जाच्या कॅट शोमध्ये पर्शियन, क्लासिक लाँग हेअर, एक्झॉटिक शॉर्ट हेअर, मेन कुन अशा विविध देशी-परदेशी जातीच्या मांजरी सहभागी होणार आहेत, जागतिक स्तरावरील तज्ज्ञ यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहे. क्लबने भारतीय भटक्या मांजरांना 'इंडियामाऊ' अशी ओळख मिळवून देण्यात यश मिळवले आहे. यावेळी मांजरांना दत्तक घेता येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले. मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत आणलेली मांजरे फोटो

बहुउपयोगी शेवगा म्हणजे ..... मिरॅकल ट्री !

Image
           बहुउपयोगी शेवगा म्हणजे ..... मिरॅकल ट्री !  मुंबई / रमेश औताडे  शेवगा, म्हणजेच मिरॅकल ट्री! या वनस्पतीचे औषधी गुणधर्म सर्वश्रुत आहेत. ग्रामीण भागात शेवग्याच्या शेंगांची लागवड ही केवळ शेती नव्हे तर पोषणाची चळवळ बनली आहे.  अनेक शेतकरी आता शेवग्याच्या शास्त्रीय पद्धतीने लागवडीकडे वळत आहेत. "एकदा लावलं की तीन-चार वर्षांपर्यंत सातत्याने उत्पादन मिळतं," असं सांगत,  प्रगतिशील उच्चशिक्षित शेतकरी संजय रावसाहेब सुरवसे यांनी या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली.उन्हाळ्याच्या सुरुवातीला शेंगांची भरघोस मागणी असते. मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमध्ये याला चांगला बाजारभाव मिळतो. हे केवळ अन्न नाही, तर आरोग्यवर्धक आहार आहे.  कॅल्शियम, आयर्न आणि जीवनसत्त्वांचा भरपूर स्रोत असलेली ही शेंग ग्रामीण भागातून परदेशातील ग्राहकांपर्यंत पोचली आहे. शेवगा व त्याची पाने याबाबत बोलायचे म्हटले तर एक पुस्तक तयार होईल. शेवग्याची पाने तर खूप महत्वपूर्ण आहेत. त्याची पावडर आज अनेक औषधात वापरून औषध कंपन्या करोडो रुपये मिळवत आहेत. शेवग्याच्या शेंगांचा हा प...

मुलाच्या निधनामुळे नियोजित कार्यक्रम रद्द

मुलाच्या निधनामुळे नियोजित कार्यक्रम रद्द मुंबई / रमेश औताडे  आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या चिरंजीवाचे निधन झाल्याने नियोजित २५ मे चा नारायण बागडे यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. बागडे यांचा मुलगा रोमी उर्फ रोहन  बागडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी  निधन झाले. त्यामुळे सर्व सत्कार कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत .राज्यातील आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, महिला मोर्चा, युवा मोर्चा, कामगार शेतकरी मोर्चा आणि चाहत्यांनी  वाढदिवसाच्या निमित्ताने होर्डिंग्ज, पोस्टर, हारतुरे या सर्व पैशाचा उपयोग महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनासाठी करावा. असे प्रसिद्धी प्रमुख श्यामभाई बागुल यांनी सांगितले.

५० वर्षापासूनच्या वृद्ध विधवा गोसेविकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

Image
शहराचा सिमेंट काँक्रिटचा विकास होत असताना मंदिरासमोरील गोमाता पालिकेच्या  कोंडवाड्यात ५० वर्षापासूनच्या वृद्ध विधवा गोसेविकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर  मुंबई / रमेश औताडे  मुंबईचा सिमेंट काँक्रिटचा आडवा उभा विकास होत असताना मुंबईतील मंदिरासमोरील जिवंत गोमाता मात्र कोंडवाड्यात टाकल्या जात आहेत. शासन पोलिस पालिका एकमेकाकडे बोट दाखवत असल्याने गोमाता सेवकांनी तीव्र आंदोलन करत सरकारचा निषेध केला. मुंबई व मुंबई परिसरातील मंदिरासमोर गाय घेऊन भक्तांच्या दर्शनासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक नाथपंथी गोसावी सेविका न्याय मागण्यासाठी आक्रमक होत बुधवारी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर सरकारच्या नावाने निषेध व्यक्त करत होत्या. महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय मंत्री यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून कार्यालयातून या सेविकांना मुंबई पोलिस आयुक्तांना भेटा असे सांगत पत्र दिले. त्याप्रमाणे या ४०० गोसेविका व गो सेवक पोलिस आयुक्त कार्यालय मुंबई येथे भेट घेण्यास आल्या असता त्यांना पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करून न्याय दिला जाईल असे सांगितले. गेल्या ५० वर्षांपासून या ...

तर भारतातील जनतेला टॅक्स भरायची वेळ येणार नाही !

Image
     तर भारतातील जनतेला टॅक्स भरायची वेळ येणार नाही ! मुंबई / रमेश औताडे  भारतातील जनता प्रत्येक गोष्टीवर टॅक्स भरते. त्यामुळे त्यांना महागाईच्या जमान्यात जगणे अवघड झाले आहे. यावर उपाय म्हणून " टॅक्स फ्री "  या चित्रपटाच्या माध्यमातून सरकारला व जनतेला एक पर्याय सांगितलेला आहे. याबाबतची माहिती चित्रपट निर्माते सुबोध शेट्ये यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ठक्कर म्हणाले, भारत सरकाने २०२३ साली ५६ लाख करोड रुपये टॅक्स विविध मार्गांनी जमा केला. सरकारने जर कमर्शियल प्रॉपर्टी टॅक्स वसुली १०० टक्के केली तर ७० लाख करोड रुपये जमा होतील. धार्मिक संस्थांच्या जावेगरील या करासाठी विचार केला तर या ७० लाख करोड रुपयात अजून भर पडेल व सामान्य जनता करमुक्त जीवन जगेल. असे शंकर ठक्कर यांनी सांगितले.  यावेळी चित्रपटाचे मुख्य कलाकार सुबोध शेट्ये, रमणीक छेडा व आदी सहकारी उपस्थित होते. " टॅक्स फ्री इंडिया फुल मुव्ही " Tax free india full movie असे यू ट्यूब वर टाईप केले तर प्रेक्षकांना हा चित्रपट मोफत पाहण्यास मिळेल.सामाजिक कार्यकर्त्या दिपा...

रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा चे आयोजन

Image
    रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा चे आयोजन       केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत घोषणा मुंबई / रमेश औताडे  प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला आणि दहशतवा‌द्यांना चांगला धडा शिकवला याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारी दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या सिन्दुर ऑपरेशनच्या यशाबद्दल रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुंबईत प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे निरपराध भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २८ जणांची क्रूर हत्या केली. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिन्दुर ऑपरेशन करून पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवा‌द्यांची ठिकाणे उध्वस्त करून १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले.याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्...

मातंग समाजाचे आझाद मैदान आंदोलन

Image
          मातंग समाजाचे आझाद मैदानात आंदोलन  मुंबई / रमेश औताडे  राज्यातील मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे आणि मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे, न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल तत्काळ सादर करावा, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागू करण्यात याव्यात या मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर जन आक्रोश महाआंदोलन करण्यात आले. त्यास राज्यभरातून या आंदोलनाला मोठ्या संख्येने मातंग समाजातील महिला उपस्थित होत्या. सकल मातंग समाजाने आतापर्यंत अनेक आंदोलने केली, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अनुसूचित जातीच्या आयोगाचे वर्गीकरण व्हावे यासाठी बदर समितीची स्थापना केली, परंतु या समितीने जवळपास वर्ष पूर्ण झाले तरी काहीही काम केले नाही. अभ्यास समितीच्या माध्यमातून विविध राज्यांचे अभ्यास दौरे करून वेळकाढू धोरण राज्य सरकारने अवलंबले आहे. या सरकारने मातंग समाजाची फार मोठी फसवणूक, दिशाभूल केली. येथे पंधरा दिवसांमध्ये आपल्याला हे आरक्षण मिळेल अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री ...

मुक्त पत्रकारांसाठी धोरणात्मक पाठबळ हवे - सुभाष देसाई

Image
     मुक्त पत्रकारांसाठी धोरणात्मक पाठबळ हवे - सुभाष देसाई मुंबई / रमेश औताडे  कोरोना काळानंतर राज्यातील सर्वच घटकांना आजही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील मुक्त पत्रकारांनाही कोरोनाचा फटका बसला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील मुक्त पत्रकार व अंशकालीन पत्रकारांची रितसर माहिती घेण्यासाठी अधिकृत पत्रकार संघटनाच्या सहकार्याने एक समिती गठित करावी व अत्यंत निकड असेल अशा मुक्त पत्रकारांसाठी एक महामंडळ स्थापन करावे. व त्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्यांचा विचार करावा. अशी मागणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई यांनी सरकारकडे निवेदन देत केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. कोरोना नंतर अनेक भांडवलदारांनी प्रिंट वृत्तपात बंद केली तर काहींनी विक्री होत नसल्याने आवृत्या कमी केल्या. तर काहींनी कामगार कपात केली. त्यामुळे अनेक पत्रकार  स्वतंत्र स्वरूपात काम करत आहेत. त्यांना नियमित नोकऱ्या मिळतात...

राजू मानकर यांची मातंग समाजासाठी भोजन व्यवस्था

Image
     महाराष्टातील मातंग समाजाचे जन आक्रोश महाआंदोलन मुंबई / रमेश औताडे  अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून जून २०२५ पासून ते लागू करावे या व इतर मागण्या घेऊन महाराष्ट्रातील सकल मातंग समाज मंगळवारी आझाद मैदानात आंदोलनात उतरला होता. राज्यभरातून आलेल्या या समाजाने जय लहुजीचा नारा देत सर्व आझाद मैदान परिसर दणाणून सोडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड्यापाड्यातून आलेल्या या समाजाच्या पिण्याच्या पाण्याची व जेवणाची सोय केली होती. समाजाचे नेते राजू मानकर यांनी यावेळी भर भव्य मंडपात जेवण वाटप नियोजन केले होते त्याचे आंदोलनकर्ते कौतुक करत होते.राष्ट्रीय मातंग स्वाभिमानी संघटन चे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.राज्य समन्वयक मारुती वाडेकर,रमेश दोडके दिलीप यादव आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यभरातून असलेल्या या हजारोंच्या संख्येतील आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून  कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी शेकडो पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खुप लढलो बेकीने आता लढूया एकीने असा फलक लाऊन हे आंदोलन सुरू होते.महाराष्ट्रील ...

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा

Image
            मेघमल्हार संकुल अन्  एकोणीस सेवक ..... नवी मुंबई / रमेश औताडे  नवी मुंबईतील चर्चेत असलेल्या मेघमल्हार सिडको वसाहत सोसायटी निवडणुकीत लोकनेते वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील तुषार नाईक पॅनलने १९–० असा दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. या निकालामुळे नवी मुंबईत नाईक गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक मजबूत पायाभूत वातावरण तयार झाले आहे. २०१८ साली सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतून तयार झालेल्या मेघमल्हार सोसायटीने सुरुवातीपासूनच आपल्या पारदर्शक आणि जनतेसाठीच्या कार्यपद्धतीने वेगळा ठसा उमटवला होता. सोसायटी नोंदणीसाठी दलालांनी लाखो रुपये मागितले असतानाही मुख्य प्रवर्तक रमेश औताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या १९ रुपयांच्या सरकारी शुल्कात केवळ २३ दिवसांत नोंदणी पूर्ण करत नवी मुंबईत एक आदर्श निर्माण करत एक इतिहास नोंदवला. कमी वेळेत व सर्वात कमी पैशात नोंदणी झालेली मेघमल्हार सोसायटी एकमेव सोसायटी ठरली असल्याची पावती सिडको अधिकाऱ्यांनी व निबंधक कार्यालयाने दिली. याच पार्श्वभूमीवर मत...

मुंबईच्या सहा तालुक्यांमध्ये भांडाफोड आंदोलन

Image
       मुंबईच्या सहा तालुक्यांमध्ये भांडाफोड आंदोलन मुंबई / रमेश औताडे  मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे माहेरघर बनली असून शहराच्या विकासकामांच्या नावाखाली लाखो कोटींचा गैरव्यवहार सुरू आहे. असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)  मुंबईच्या सहा तालुक्यांमध्ये भांडाफोड आंदोलन करणार असल्याचा इशारा उत्तर पश्चिम  जिल्हाध्यक्ष अजितदादा रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष  सचिनभाऊ लोंढे यांनी दिला आहे. मान्सून साफसफाई अंतर्गत झालेला भ्रष्टाचार, पालिकेच्या ठेवीवर मारलेला डल्ला, सिमेंट काँक्रीकरण रस्ते भ्रष्टाचार, रस्त्याच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी व मुंबईकरांना होणारा त्रास, नगरसेवकांना पाच कोटीचा निधी देऊन पक्ष फोडा फोडी प्रकरण,आदी विविध मुद्द्यावर हे भांडा फोड आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व आर्थिक घोटाळ्यांची माहिती जनतेसमोर मांडण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांची जबाबदारी ठरवण्याची मागणी केली जाणार आहे. या आंदोलन मोहिम व जनजागृतीमुळे मुंबईकरांना त्यांच्...

प्रबोधन कसे सुरू झाले....

Image
योगेश वसंत त्रिवेदी त्यावेळी प्रबोधनकार सरकारीच्या नोकरीत होते. त्यात राहून वर्तमानपत्र काढणे शक्य नव्हते राजीनामा देण्याची गरज होती. त्यांनी वरिष्ठांना कळवले चीफ सेक्रेटरी यांच्याकडे प्रकरण गेले.  एका खास सरकारी हुकमाने त्यांना वृत्तपत्र काढण्याची परवानगी देण्यात आली व 'पुन्हा अशी परवानगी कोणाला देऊ नये' अशा अटीसह, त्याबद्दल प्रबोधनकार लिहितात,  "कर्दनकाळ ब्रिटिश सरकारच्या आमदानीत सरकारी नोकरीत असतानाही वर्तमानपत्र काढण्याची खास परवानगी मिळवणारा मला वाटते मीच पहिला आणि शेवटचा शासकीय नोकर आहे. १६ ऑक्टोबर १९२१ रोजी "प्रबोधन" प्रसिद्ध झाले. पासष्टायन.... योगेश वसंत त्रिवेदी

राज्यातील सरकारी रुग्णालयातील गरिबांच्या रुग्णवाहिकांची चाके ठप्प होण्याच्या मार्गावर

Image
राज्यातील सरकारी रुग्णालयातील गरिबांच्या रुग्णवाहिकांची चाके ठप्प होण्याच्या मार्गावर मुंबई / रमेश औताडे  राज्यातील सरकारी रुग्णालये अत्याधुनिक करत गोरगरीब जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी सरकार पावले टाकत आहे. मात्र या रुग्णालयातील कंत्राटी कामगार व १०८ रुग्णवाहिका चालक समान काम समान वेतन ही मागणी घेऊन आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. सेवा सुरू ठेवत प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारने जर गांभीर्याने विचार करत आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आंदोलन तीव्र व त्यानंतर बेमुदत केले जाईल असा इशारा या कामगारांचे नेते कॉम्रेड डी एल कराड यांनी दिला आहे. गल्लीपासून दिल्ली पर्यंत तसेच राष्ट्रपती भवन या सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर कामगार ठेवणारे कंत्राटदार बी व्ही जी ग्रुप चे सर्व्हे सर्व्ह हणमंतराव गायकवाड यांच्या कंपनीचे हे १०८ रुग्णवाहिकेचे चालक या आंदोलनात सामील झाल्याने या गोरगरिबांच्या रुग्णवाहिका ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायालयाचे आदेश जर हे कंत्राटदार मान्य करत नसतील तर सरकार त्यांना पाठीशी का घाल...

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव !

Image
  सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले                            यांचा ८३ वा जन्मोत्सव !                      सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव                 रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल ! देशविदेशांतून २५ हजार, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतून २ हजार ५०० हून अधिक हिंदू उपस्थित रहाणार ! मुंबई / रमेश औताडे  सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्...