मातंग समाजाचे आझाद मैदान आंदोलन

          मातंग समाजाचे आझाद मैदानात आंदोलन 
मुंबई / रमेश औताडे 

राज्यातील मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे आणि मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे, न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल तत्काळ सादर करावा, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागू करण्यात याव्यात या मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर जन आक्रोश महाआंदोलन करण्यात आले. त्यास राज्यभरातून या आंदोलनाला मोठ्या संख्येने मातंग समाजातील महिला उपस्थित होत्या.

सकल मातंग समाजाने आतापर्यंत अनेक आंदोलने केली, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अनुसूचित जातीच्या आयोगाचे वर्गीकरण व्हावे यासाठी बदर समितीची स्थापना केली, परंतु या समितीने जवळपास वर्ष पूर्ण झाले तरी काहीही काम केले नाही. अभ्यास समितीच्या माध्यमातून विविध राज्यांचे अभ्यास दौरे करून वेळकाढू धोरण राज्य सरकारने अवलंबले आहे. या सरकारने मातंग समाजाची फार मोठी फसवणूक, दिशाभूल केली. येथे पंधरा दिवसांमध्ये आपल्याला हे आरक्षण मिळेल अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अनेक मंत्र्यांनी यादी देखील मोठ-मोठे आश्वासन दिले होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. यावेळी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही अशी माहिती सकल मात्र समाजाच्या पदाधिकारी सुनीताताई तूपसौंदर्य आणि योगेश शिंदे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन