मुख कर्करोग दिनानिमित जनजागृती अभियान

             मुख कर्करोग दिनानिमित जनजागृती अभियान
मुंबई / रमेश औताडे 

तंबाखूचे सेवन आता वैयक्तिक राहिले नसून एक राष्ट्रीय आरोग्य संकट बनले आहे. तोंडाच्या कर्करोगाच्या जगातील एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत. दरवर्षी ७७ हजार नवीन रुग्णाचे निदान होते व ५२ हजार लोकांचा मृत्यू होतो. तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांचा जगण्याचा दर फक्त ५० टक्केच आहे. यावर उपाय म्हणून तंबाखू सेवन बंद करावे व वेळोवेळी तोंडाची तपासणी करून घ्यावे. अशी माहिती जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर अपोलो हॉस्पिटलचे डॉ.अनिल डी क्रूझ यांनी सांगितले.

तंबाखूच्या व्यसनातून बरे होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना या तंबाखू मुक्त अभियानातून मदत मिळेल असे सांगत अरुणेश पुणेथा म्हणाले, धूररहित तंबाखू, सुपारी आणि अल्कोहोल यांचा एकत्रितपणे वापर करणे खूप घातक आहे. तोंडाचा कर्करोग लवकरात लवकर समजून आल्यास बरा होऊ शकतो असे किरण शिंगोटे यांनी सांगितले. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला तंबाखू सेवन करणाऱ्यांनी तपासणी करून घ्यावी. वारंवार होणारा अल्सर, लाल किंवा पांढरे ठिपके, गाठी आणि बरे न होणारे वण यासारख्या सुरुवातीच्या लक्षणांची तपासणी करून पुढील उपचार केले जातील. असे डॉ रवी शंकर यांनी सांगितले.

सोशल मीडिया व सर्वात जास्त जाहिराती पान मावा गुटखा या अमली पदार्थांच्या असतात. या जाहिराती दाखवताना कायद्याचे पालन करत सुपारी, सोडा अशी नावे देऊन उद्देश साध्य केला जातो.असे डॉ साताक्षी चटर्जी यांनी सांगितले.

RAMESH AUTADE 
7021777291




Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन