मुलाच्या निधनामुळे नियोजित कार्यक्रम रद्द
मुलाच्या निधनामुळे नियोजित कार्यक्रम रद्द
मुंबई / रमेश औताडे
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या चिरंजीवाचे निधन झाल्याने नियोजित २५ मे चा नारायण बागडे यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
बागडे यांचा मुलगा रोमी उर्फ रोहन बागडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे सर्व सत्कार कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत .राज्यातील आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, महिला मोर्चा, युवा मोर्चा, कामगार शेतकरी मोर्चा आणि चाहत्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने होर्डिंग्ज, पोस्टर, हारतुरे या सर्व पैशाचा उपयोग महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनासाठी करावा. असे प्रसिद्धी प्रमुख श्यामभाई बागुल यांनी सांगितले.
Comments
Post a Comment