संविधान मानणाऱ्यांच्या बाजूने आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा


मुंबई / रमेश औताडे 

काँग्रेस पक्ष संविधानाच्या बाजूने भक्कम पणे उभा राहिला आहे. इतकेच नव्हे तर या राज्यात त्यांच्या मदतीने खासदार, आमदार, मंत्री पदे मिळाली आहेत. आजपर्यंत त्या पक्षाने पुरोगामी विचारसरणीची कास सोडली नाही. मग अशा उतरत्या काळात त्या पक्षाला साथ देणे आवश्यक आहे. असे मत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर रायगड येथे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी समर्थन जाहीर केले.  या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, नागपूर विभागिय अध्यक्ष प्रवीण आवळे, प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, हंसराज उरकुडे शालिक बांगर, गौतम बागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

विरारमध्ये विरार रन २०२५ चे आयोजन

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर