रुग्णालयातील पेशंटच्या ताटातील भात वादाच्या भोवऱ्यात



 

मुंबई / रमेश औताडे


राज्यातील विविध रुग्णालयात पेशंटसाठी जी अन्नाची सोय केली जाते त्यामध्ये भात हा मुख्य घटक असतो. या भातासाठी लागणारा तांदूळ खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते. मात्र या तांदूळ पुरवठा योजनांच्या निविदा प्रक्रियेत वाद निर्माण झाला असून लेखापरीक्षण अहवाल आता कोणाला अडकवणार यावर प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

निविदा प्रक्रिया, अटी-शर्ती, दरनिश्चिती व पुरवठा व्यवस्थापन या बाबी जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने राबविल्या जात असल्याने एकसमानता व स्पष्टतेचा मुद्दा उपस्थित होत आहे.
नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना निविदा प्रक्रियेचे अधिकार असले, तरी निविदा कागदपत्रांतील तांत्रिक बाबी, पात्रतेचे निकष आणि कालमर्यादा याबाबत काही जिल्ह्यांमध्ये अधिक स्पष्टीकरणाची गरज असल्याचे चित्र आहे. परिणामी प्रक्रिया समजून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ लागत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे.

तांदूळ हा सार्वजनिक वितरण व कल्याणकारी योजनांसाठी अत्यावश्यक घटक असल्याने, गुणवत्तेपासून ते वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध अंमलबजावणी अपेक्षित आहे. मात्र जिल्हानिहाय अंमलबजावणीत असलेल्या फरकामुळे पुरवठा प्रक्रियेबाबत विविध प्रश्न लेखापरीक्षण अहवालात उपस्थित केले आहेत.

प्रशासनिक सूत्रांकडून सर्व प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच राबवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र निविदा प्रक्रिया अधिक सुस्पष्ट, पारदर्शक व सर्व संबंधितांना सहज समजेल अशा स्वरूपात मांडल्यास अंमलबजावणीत सुसूत्रता येईल, असे मत लेखापरीक्षण अहवाल सांगत आहे.

तांदूळ पुरवठ्यासारख्या मूलभूत बाबतीत जिल्हा स्तरावर एकसमान कार्यपद्धती ठरवण्याची गरज असून, यामुळे प्रशासन व नागरिकांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबईतील पालिकेचे सायन रुग्णालय तांदूळ खरेदी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याने राज्यातील रुग्णालयांच्या अन्न खरेदी प्रकरणात मनमानी कारभार सुधारावा अशी मागणी पेशंट करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

विरारमध्ये विरार रन २०२५ चे आयोजन

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर