महाविद्यालयीन महर्षी स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी
मुंबई / रमेश औताडे
महर्षी दयानंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित मिस्टर अँड मिस महर्षी स्पर्धेत स्वरूप धुरी याने मिस्टर महर्षी, तर संतोषी गवळी हिने मिस महर्षी चा किताब पटकावला. १६० मुलांमधून अंतिम फेरीसाठी १२ स्पर्धक पात्र ठरले होते. केवळ बाह्य सौंदर्यावर नव्हे तर मुलांच्या सर्वांगीण कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
'कम्युनिकेशन स्किल', 'लॉजिकल रिझनिंग', 'प्रेझेंटेशन' तसेच 'अॅकॅडेमिक' आणि 'नॉन-अॅकॅडेमिक' अशा विविध कठीण पातळ्यांवर मुलांची निवड करण्यात आली होती. १६० मुलांमधून निवडले गेलेले शेवटचे १२ स्पर्धक अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि मराठी टेलिव्हिजन मधल्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका मनाली पवार उपस्थित होते.
संदीप चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात स्वतःला कसे सिद्ध करावे, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. प्रिया राजेश पारकर यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले .यावेळी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. उमेश शुक्ला यांचीही प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाच्या कन्व्हेनर डॉ. नम्रता होवाळ, श्रेया चवरकर आणि त्यांच्या कमिटी मेंबर्सनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन कायनात खातीब आणि डॉ. उषा दुबे यांनी केले. महाविद्यालयाच्या या पारंपारिक आणि अत्यंत लोकप्रिय इव्हेंटला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
संपादक रमेश औताडे
7021777291
rameshautade74@gmail.com
Comments
Post a Comment