सरकारच्या आश्वासनानंतर होमिओपॅथिक डॉक्टर्सचे आंदोलन स्थगित

सरकारच्या आश्वासनानंतर होमिओपॅथिक डॉक्टर्सचे आंदोलन स्थगित 
मुंबई  / रमेश औताडे 

महाराष्ट्र शासनाने BHMS CCMP उत्तीर्ण डॉक्टर्सची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये करण्याचा कायदेशीर निर्णय घेतला असून उच्च न्यायालयाने देखील त्या निर्णयाला मान्यता दिली आहे. तरीदेखील MMC प्रशासन नोंदणी प्रक्रियेत विलंब करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य होमिओपॅथीक डॉक्टर्स कृती समिती (मुंबई विभाग)ने आंदोलन छेडले आहे.

आज (दि. 30 सप्टेंबर 2025) वैद्यकीय शिक्षण विभागात “BHMS CCMP DOCTORS च्या MMC नोंदणीचा पुनर्विचार” या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस IMA संघटनांचे प्रतिनिधी आमंत्रित असताना संबंधित BHMS CCMP डॉक्टरांचे प्रतिनिधी मात्र वगळण्यात आले आहेत. याविरोधात आंदोलन करत आमच्या प्रतिनिधींनाही त्या बैठकीत संधी द्यावी, अशी मागणी समितीने केली आहे.

भारतीय वैद्यकीय केंद्रीय परिषद एम एम ची नोंदणी ची दिरंगाई आणि यावर इंडियन मेडिकल असोसिएशन सोबत मंत्रालयातील बैठक विरुद्ध  बी एच एम एस भारतीय वैद्यकीय केंद्रीय परिषद कोर्स  केलेल्या डॉक्टरांनी ३० मी २०२५ रोजी सरकार समर्थनार्थ रॅली करण्यात आली.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी  भारतीय वैद्यकीय केंद्रीय परिषद एम एम सी नोंदणी  दिरंगाई होणार नाही आणि भारतीय वैद्यक संघटना ची एम एस सी नोंदणी थांबवण्याची मागणी धुडकावून 
Iआय एम ए ला सरकार न्यायालय आदेश पुढे घेऊन जाईल सांगीतले . अशी माहिती कृती समिती अध्यक्ष संतोष अवचार  व कृती समिती  सचिव  डॉ सुरेखा फासे यांनी दिली.

होमिओपॅथिक डॉक्टरांना आरोग्य सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून सामावून घ्यावे, हीही प्रमुख मागणी समितीकडून करण्यात आली आहे.

राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे सहकार्याबद्दल समितीने आभार मानत, नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

“MMC प्रशासकांवर कायदेशीर कारवाई करून BHMS CCMP डॉक्टर्सची नोंदणी तातडीने सुरू करावी; अन्यथा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संघर्ष अधिक गडद होईल,” असा इशारा होमिओपॅथीक डॉक्टर्स कृती समितीने दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन