सफाई कामगार महिलेला ध्वजारोहणाचा मान........कामगारांना मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप

सफाई कामगार महिलेला ध्वजारोहणाचा मान

कामगारांना मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप

मुंबई / रमेश औताडे 

स्वच्छता दूत फाउंडेशनच्या वतीने मानखुर्द येथील स्वच्छता कामगार प्रशिक्षण केंद्रात भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण करण्याचा मान सफाई कामगार महिला सुनीता चौधरी यांना देण्यात आला.

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुकेश पाखरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे समाजभूषण सुदाम आवाडे, श्रावण नाटकर यांची उपस्थिती होती. फाउंडेशनच्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती देत सफाई कामगारांना मोफत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आली.

फाउंडेशनचे समन्वयक जितेंद्र साळी, अंद्रेस गायकवाड, ॲड .प्रिया नाटकर,  परमेश्वर कांबळे, सुमनबाई आलाट, ताईबाई पाखरे,  रिबेका पाखरे, कलीम भाई, दिगंबर तुपे, अरुण गायकवाड,  गंगाराम साठे, नितीन हिवाळे, कळनाजी लोंढे, पल्लवी पाखरे, माया साबळे, ताईबाई पाखरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन फाउंडेशनचे समन्वयक जितेंद्र साळी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन