खंडुराज गायकवाड यांचा संघर्षमय प्रवासाला शैक्षणिक यशाची साथ

खंडुराज गायकवाड यांचा संघर्षमय प्रवासाला शैक्षणिक यशाची साथ
मुंबई / रमेश औताडे

मंत्रालयातील अनुभवी पत्रकार, लोककलावंतांचे आधारस्तंभ आणि लोककलेचे संशोधक खंडुराज गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करत एम.ए. (मराठी) पदवीत A- ग्रेड मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खंडुराज गायकवाड हे गेली अनेक वर्षे महाराष्ट्र शासनाच्या विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून, विशेषतः लोककलेच्या संवर्धनासाठी ते झटत आले आहेत. केवळ व्यासपीठावरच नव्हे, तर प्रशासनिक आणि बौद्धिक पातळीवरही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या या शैक्षणिक यशाचा गौरव करताना, डॉ. शिवाजी वाघमारे, संचालक – लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांनी सांगितले, "खंडुराज गायकवाड हे केवळ पत्रकार किंवा कलाकार नाहीत, तर ते लोकसंस्कृतीचे जीवंत प्रतिनिधी आहेत. त्यांनी आपल्या शिक्षणात घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे."

जगण्याच्या संघर्षातूनही शिक्षणाची वाट न सोडता, समाजासाठी आदर्श ठरणारा खंडुराज गायकवाड यांचा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

त्यांच्या पुढील शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन