नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांचा सत्कार
नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांचा सत्कार
मुंबई / रमेश औताडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) उत्तर पश्चिम जिल्हा, जोगेश्वरी तालुक्याच्या वतीने मेघवाडी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांची सदिच्छा भेट घेऊन जाहीर सत्कार करण्यात आला. एस बी वन मिल स्पेशल प्रदीप यादव यांच्या सहकार्याने पार पडला. या वेळी मेघवाडी परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि नागरिक व महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी तालुका अध्यक्ष विनयजी साळवी, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष (युवक) सचिनभाऊ लोंढे, महिला तालुकाध्यक्ष संजीवनी कोलते, रोहिणी तांबे, युवक वार्ड अध्यक्ष फिरोज शेख, जिल्हा सहसचिव (युवक) तन्नोभाई यांनी केली. कार्यक्रमाचे आयोजन वॉर्ड ७९ युवक अध्यक्ष नितीन लोंढे यांनी केले.
Comments
Post a Comment