रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी अनोखे आंदोलन

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी अनोखे आंदोलन
मुंबई / रमेश औताडे 

मुंबईतील सर्व उड्डाणपूल व प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. अपघात टाळण्यासाठी त्वरित दुरुस्तीची उपाययोजना करावी. खड्डे दुरुस्तीसाठी आतापर्यंत किती निधी खर्च झाला याची संपूर्ण आकडेवारी जाहीर करावी. भविष्यात उड्डाणपुलांची गुणवत्ता व देखभाल सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागण्या करत बांद्रा येथील एम.एस.आर.डी.सी. कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ॲम्बुलन्स घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

रराज्य सरकार व एम.एस.आर.डी.सी. प्रशासनाला मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले, उपाध्यक्ष ओमकार शिर्के, जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर, सचिन लोंढे आणि इमरान तडवी, सेलवेन देवेंद्र, हनीफ पटेल, वैभव पांचाळ, कमलेश दांडेकर, लक्ष्मण बाजी, स्वप्निल पाटील यांनी इशारा दिला आहे की या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू. 

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन