डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या शतजयंतीनिमित्त भव्य कृषी परिषद आणि प्रदर्शन
डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या शतजयंतीनिमित्त भव्य कृषी परिषद आणि प्रदर्शन
मुंबई / रमेश औताडे
प्रसिद्ध कृषी व पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, सिंचन, गुंतवणूक, विपणन, विमा, अन्न प्रक्रिया, गोदाम व शितगृह आदी विषयांवरील परिषद व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम गुरुवार, ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) येथील आर. एच. पाटील सभागृह, बी.के.सी. बांद्रा (पूर्व), मुंबई येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.३० ते ११.३० वाजता मा. डॉ. सुजितकुमार शुक्ला, संचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) व मा. श्री. अशोक किरणाळी, संचालक, कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. अशोक कुमार पाठक, इसीजीसी लि. भारत सरकारचे महाव्यवस्थापक श्री. कुमार अंशुमान, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ श्री. तिर्थकार पटनाईक, पीडीलाईट इंडस्ट्रीज लि. चे उपाध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला, तसेच टाटा स्टील लि. चे ग्लोबल वायर्स विभागप्रमुख श्री. अनुराग पांडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्री. चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ हे असतील.
११.४५ ते १२.४५ वाजेपर्यंत मान्यवर पाहुण्यांचे मार्गदर्शन होणार असून यामध्ये कृषी विभागाचे सहसंचालक श्री. बालाजी ताटे, सोमय्या विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. व्ही. एन. राजासेखरन पील्लई, आकार चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती अमला रुईया, इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलीकॉन इन अॅग्रीकल्चर (अमेरिका) चे सदस्य डॉ. शिवाजीराव थोरात, सोहन इंडस्ट्रीज प्रा. लि. चे अध्यक्ष श्री. भारत तावरे आणि टाटा स्टीलचे श्री. प्रशांतकुमार मिश्रा यांचा समावेश आहे.
दुपारी १२.४५ ते १.३० या वेळेत बँका, वित्तीय संस्था आणि अन्य कंपन्यांचे सादरीकरण होणार असून त्यानंतर १.३० ते २.३० या वेळेत उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमात प्रगतिशील शेतकरी, शेतकरी गट आणि एफपीओ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
दुपारी २.४५ ते ३.४५ या वेळेत राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सादरीकरण होणार असून ३.४५ ते ४.३० या वेळेत कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व शेतकऱ्यांसाठी प्रश्नोत्तर सत्र होणार आहे. त्यानंतर ४.३० ते ५.०० चहा व नाश्ता आणि संध्याकाळी ५ ते ६ वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव सहभागी होणाऱ्यांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान १५ मिनिटे आधी शासकीय ओळखपत्रासह उपस्थित राहावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: ९९२०१८४६६६ / ९५९४८८४६६६.
Comments
Post a Comment