दोषींवर कठोर कारवाई करू - मंत्री संजय शिरसाट
दोषींवर कठोर कारवाई करू - मंत्री संजय शिरसाट
आंरिमो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे व पदाधिकारी
मुंबई / रमेश औताडे
निलंबित समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब देशमुख हे साहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे सह इतर अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक बदनाम करून जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी लक्ष घालावे अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, कास्टाईब महासंघाचे नामदेवराव निकोसे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, शहराध्यक्ष प्रा. रमेश दुपारे, सुखदेवराव मेश्राम जयदेव चिंवडे, पुण्यशील बोदिले,सुरज ढोणे धर्मा बागडे यांनी निवेदन दिले. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे ठोस आश्वासन शिष्टमंडळाला त्यांनी दिले.
Comments
Post a Comment