पत्रकारांसह कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी
पत्रकारांसह कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी
मुंबई / रमेश औताडे
अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन व रोटरी क्लब नॉर्थ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, १० जुलै रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदाना जवळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हृदय व रक्तदाब, मधुमेह, रक्तगट व हिमोग्लोबिन सह संपूर्ण आरोग्य तपासणी होणार असून मोफत औषध दिले जाणार आहे. वोखार्ड हॉस्पीटल चे डॉक्टर व तज्ज्ञ येणार आहेत. असे युनियनचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी सांगितले.
Comments
Post a Comment